महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- दगडांची अवैधरीत्या वाहतूक करणारा टेम्पो पळविल्या प्रकरणी संगमनेर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरणे सजा पीक पाहणीचे काम सुरू होते.
त्याचवेळी कोळवाडे येथून संगमनेरकडे टाटा टेम्पो (एम. एच. 20, बी. टी. 3876) मध्ये दगड भरून जात असताना आढळून आला. सदर टेम्पो चालकास पिंपरणे गावचे कामगार तलाठी संग्राम देशमुख यांनी थांबण्याचा इशारा केला असता त्याने चालकाने टेम्पो थांबविला. त्यात दगड गौण खनिज भरलेले दिसले. चालकाला नाव, पत्ता विचारला असता त्याने नाव सांगण्यास नकार दिला.
सदरची गाडी कोणाची आहे, याबाबत विचारले असता चालकाने अण्णासाहेब कुसळकर रा. निमज यांची असल्याचे कामगार तलाठी देशमुख यांना सांगितले. त्यावेळी देशमुख यांनी त्या टेम्पोचालकास गौणखनिज भरण्याचा आणि वाहतुकीचा परवाना आहे का? असे विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदर टेम्पो तहसील कार्यालयात लावण्या बाबत सांगितले. टेम्पो तहसील कार्याल यात लावण्यास घेऊन येत असताना चालकाने टेम्पो तहसील कार्यालयात न नेता सरळ भरधाव वेगाने पळवून नेला. याबाबत देशमुख यांनी संगमनेर तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…