हिंगणघाट नगर पालिकेत अतिक्रमणच्या नावाने हप्ता वसुली सुरू, याला मुख्याधिकारी यांचा आशीर्वाद आहे का?

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नगर पालिकेत मोठ्या प्रमाणात हलगर्जी कारभार सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरिकाचा नगर पालिकेचे मुख्याधिकारी आणि प्रशासनवर मोठ्या प्रमाणात रोष दिसून येत आहे. त्यात आता अतिक्रमणाच्या नावाखाली नगर पालिकेतील कर्मचाऱ्यांनी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या नावाने हप्ता वसुली आणि दारूची वसुली सुरू केल्याची चर्चा संपूर्ण गावात वाऱ्या सारखी पसरत आहे. या हप्ता वसुलीला हिंगणघाट नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांचा आशीर्वाद तर नाही ना हा प्रश्न उपस्थित होत आहे.

मागील काही दिवसांपासून हिंगणघाट नगर पालिकेतील कार्यरत असलेले कर्मचारी आपल्या पद्दाचा गैरवापर करून आपला खिस्सा कशा गरम होईल याकडे लक्ष केंद्रित करून कार्य करत आहे. त्यात या कर्मचाऱ्यांना एक दारूचा खंबा दिला की, चार दिवसाचे काम एका दिवसात झाले म्हणजे समजा नाही तर, छोट्या छोट्या कामासाठी शहरातील नागरिकांना नगर पालिकेत चप्पल घासावी लागत आहे. त्यामुळे नगर पालिका प्रशासन आणि मुख्याधिकारी यांच्यावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

हिंगणघाट नगर पालिकेत लोकनियुक्त लोक प्रतीनिधीचा कार्यकाळ संपल्यानंतर पालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. लोक प्रतिनिधी नसल्यामुळे कुणी विरोध करणारे नाही त्यामुळे नगर पालिकेच्या कर्मचारी आपला मनमानी कारभार सुरू केला आहे. कुठलेही काम असो पैसे आणि दारू शिवाय पूर्ण करण्यात येत नाही. दिवसा ढवळ्या येथून फाईल गडप करण्यात येत आहे. जेव्हा माहिती अधिकारात माहिती मागितली तर त्या फाईल परत जागेवर आणून ठेवल्या जातात. याबाबत विचारणा केली असता उडवा उडविचे उत्तर दिली जात आहे.

नपा कर्मचारी झाले मालामाल.
आज शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यासाठी नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना धमकवण्यात येत आहे. अतिक्रमणची कारवाई रोखण्यासाठी हे कर्मचारी मग नागरिकां कडून चिरीमिरी घेऊन त्याच्या अतिक्रमणाला आशीर्वाद देऊन कारवाई ठप्प करत असल्याचे सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागात कार्यरत असलेले कर्मचारी आज मोठ्या प्रमाणात गब्बर झाले आहे. या सर्व कर्मचाऱ्याच्या संपत्तीची जाच करून यांच्या अवैध संपत्ती जप्त करून याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंगणघाट शहरातील नागरिक करत आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

1 hour ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

3 hours ago