पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे :- दि. २८/१२/२०२२ रोजी रात्रौ २२/०० वा. सिहंगड रोड पोलीस स्टेशन कडील रात्रगस्तीस असणारे अंमलदार पोलीस अंमलदार, धनंजय पाटील व पोलीस अंमलदार, अक्षय इंगवले हे वडगाव मार्शल ड्युटीस कर्तव्यावर असताना, वडगाव सिहंगड कॉलेजचे पाठीमागील गेटजवळ दोन इसम हाता मध्ये कोयते घेवुन दहशत माजवुन लोकांना हॉटेल, दुकाने जबरदस्तीने बंद करण्यास भाग पाडुन येणा-या जाणा-या लोकांना कोयते उगारून दाखवुन दहशत पसरवित असल्याचे नागरीकांनी सांगितले..
सदरची प्रकार हा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे हद्दीतील असल्याने हद्दीची पर्वा न करता, धनंजय पाटील व अक्षय इंगवले यांनी प्राप्त माहितीची गांभीर्य ओळखुन सदर ठिकाणी वेळेत जावुन मोठया धाडसाने कोयता घेवुन दहशत पसरविणा-यास ताब्यात घेवुन पुढील कार्यवाहीकामी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले. सदर कामगिरी बाबत तेथील नागरीकांनी प्रतिष्ठत व्यक्तींनी पोलीसांनी केलेल्या कामाची प्रशंसा करून त्यांचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार केला होता.
दि.०६/०१/२०२३ रोजी मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहरातील वरिष्ठ
अधिकारी व सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांची (WRM) आठवडा आढावा बैठक
घेतली होती. सदर बैठकी मध्ये सिहंगड रोड पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार, धनंजय पाटील व पोलीस अंमलदार, अक्षय इंगवले यांनी केलेल्या चांगल्या कामाची प्रशंसा करून, त्यांना पुष्पगुच्छ देवून प्रत्येकी २५ हजार रुपये बक्षीस व जीएसटी मंजुर केले आहे. सदर मिटींगकामी
हजर असणारे सर्व अधिकारी यांनी देखील टाळया वाजवुन त्यांचे कामाचे कौतुक केले. पुणे शहरातील सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी समाजाप्रती चांगले काम करावे याबाबत प्रोत्साहीत करून त्यांना तसे मार्गदर्शन केले. तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी यापुढे देखील अशीच उत्तम कामगिरी करावी यासाठी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर हे त्यांना योग्य व उत्तेजनार्थ बक्षीस देणार आहेत.
सदर मिटींगकामी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेशकुमार मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, प्रशासन, श्री जालिंदर सुपेकर, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग, श्री. राजेंद्र डहाळे, मा. अपर पोलीस आयुत पुर्व प्रादेशिक विभाग श्री. रंजन शर्मा तसेच इतर विभागाकडील सर्व परिमंडळीय अधिकारी उपस्थित होते.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…