पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
गुन्हे शाखा युनिट २, पुणे शहर
पुणे :- शहरातून तडीपार केलेले इसम वेषांतर करुन अथवा गपचूप पुणे शहरात येऊन गुन्हे करत असलेबाबत निदर्शनास आल्याने मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी तडीपार असून देखील पुण्यात येऊन गुन्हे करणारे असे आरोपी शोधून कारवाई करणेबाबत तसेच एम. ओ. बी. लिस्ट मधील जास्तीत जास्त पाहिजे / फरारी आरोपीचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत व यापुर्वी आर्म अॅक्ट ३ (२५) मध्ये अटक आरोपी चेकींग करणेबाबत आदेश दिले होते.
त्या अनुशंगाने युनिट-२ कडील प्रभारी अधिकारी श्री क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची टिम तयार करून, बंडगार्डन पोलीस ठाणे हददीत ताडीवाला रोड परिसरातील पाहिजे / फरारी आरोपी चेकिंग करीत असताना तडीपार इसम नामे वसीम अब्दुल सत्तार शेख हा ०६ नंबर रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबला असल्याची खात्रीशीर बातमी युनिट-२ कडील पोलीस अंमलदार, निखिल जाधव व पोलीस हवालदार मोहसिन शेख यांना मिळाली. त्यांनी लागलीच सोबत असलेल्या स्टाफच्या मदतीने बातमीच्या ठिकाणी धाव घेऊन सदर वसीम अब्दुल सत्तार शेख, वय-२४ वर्षे, रा. प्रायवेट रोड, इनाम मज्जिद, ग.नं. ४१ यास ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे केलेल्या चौकशीत त्याने कोणतीही पुर्वपरवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्याचेविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम-१४२ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करता बंडगार्डन पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. राहा. पोलीस आयुक्त गुन्हे श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस निरीक्षक श्री. क्रांतीकुमार पाटील, सपोनि. विशाल मोहिते, पोलीस अमलदार मोहसिन शेख, विनोद चव्हाण, संजय जाधव, उज्जवल मोकाशी, साधना ताम्हाणे, रेश्मा उकरंडे, शंकर नेवसे, कादीर शेख, निखील जाधव, समीर पटेल, विनोद कोकणे, गणेश थोरात, उत्तम तारु व नागनाथ राख या पथकाने केली आहे…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…