पुण्यामध्ये मिलट्ररी मध्ये कामाला असल्याची बतावणी करून एका साताऱ्यातील महिलेसह अनेकांची ऑनलाईन फसवणूक.

✒️राजश्री ढमाळ, सातारा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सातारा:- खंडाळा पोलीस स्टेशनचा हद्दीतून एक ऑनलाईन फसवणुकीची घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. आरोपीने विविध सरकारी विभागातील बनावटी ओळखपत्र दाखवून ही फसवणूक केली हे महत्वाची बाब आहे. राजकुमार गुप्ता आणि जय कुमार दहिया अशा वेगवेगळ्या नावाने या सरकारी विभागातील बनावटी आयडी कार्ड तयार करून या फसवणुक केली आहे.

ऑनलाईन ॲप फेसबुकचा वापर करत हे संघटीत सायबर गुन्हेगार आर्मी, एयर फोर्स, सीआयसीफ इत्यादी कर्मचारी असल्याचे गणवेशधारी ओळखपत्र दाखवून, विमानतळ, आर्मी, सीआरपीएफ येथे नोकरीस असल्याचे सांगून फेसबुक वर मोटार सायकल वाहने विकण्यास आहेत. अशी जाहिरात करत वाहन खरेदी करण्यासाठी ऑनलाईन पेटीएम द्वारे पैसे भरण्यास सांगतात. आधी पैसे भरा त्यानंतर वाहन तुम्हाला तुमच्या पत्त्यावर पाठवतो. आवडले नाही तर पैसे परत मिळतील असे सांगण्यात येते. परंतु प्रत्यक्षात संघटीत सायबर गुन्हेगारांकडून आपली फसवणूक झाल्याचे काही दिवसांनी आपल्या लक्षात येते. अशीच घटना खंडाळा तालुक्यातील पारगाव येथील एका महिला बरोबर घडल्याचे समोर आले आहे.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, मनिषा दिलीप सावंत मु. पो. पारगाव ता. खंडाळा जि. सातारा ही महिला येथे राहत अजून काल दुपारी वाजता 6372781269 या नंबर वरून या फोन आला. स्कूटी घेण्याबाबत हा फोन आला होता. त्यावर त्यांनी माहिती विचारली असता मी पुण्यामध्ये मिलट्ररी मध्ये ऑफिसला कामाला आहे व माझी चंदीगडला ट्रान्सफर झाली आहे त्यामुळे मला माझी स्कूटी विकायची आहे व इतर सामान पण विकायचे आहे असे सांगितले व मला स्कूटीचे फोटो व कागदपत्रे (KYC) व मिलट्ररीचे स्मार्ट कार्ड आरोपीने महिलेला पाठवले आणि ऑनलाईन पेमेंट पाठवले तर मी लगेच आपणास गाडी आणून देतो असे आरोपी बोलला. त्यावेळी फिर्यादी महिला त्याला बोलली की, माझ्याकडे कॅश पेमेंट आहे असे सांगितले असता कॅश पेमेंट नाही चालत ऑनलाइन पेमेंट पाठवा व मी गाडी घेऊन येतो असे सांगितले व त्याच्या बोलण्यावरुन १३,००० पाठवले. पैसे त्याच्या अकाऊंट मध्ये टाकल्या नंतर त्याला फोन केला असता आता आरोपी फोन कट करत आहे उचलत नाही. आरोपीने 6372781289 व 6372718414 या दोन फोन क्रमांकावरून त्यांना फोन केला होता. ज्यावेळी फिर्यादी महिला मनिषा सावंत यांना आपली फसवणूक झाल्याचे कळले त्यांनी खंडाळा पोलीस स्टेशन गाठून आपल्या बरोबर झालेल्या फसवणुकीची लेखी तक्रार दाखल केली.

खंडाळा पोलीस स्टेशनने लेखी तक्रार दाखल करून घेत पुढील तपास सुरू केला आहे. तरी अशा ऑनलाईन फसवणुकीचा घटने पासून सावधानता हाच उपाय असून असे ॲप वापरताना काळजी घेण्याचा सल्ला पोलिस आणि महाराष्ट्र संदेश न्युज आपणास देत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

5 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

5 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

6 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

6 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

6 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

6 hours ago