प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- स्थानिक भिमोदय बुद्ध विहार दत्त वार्ड येथे पार पडलेल्या सभेत भिम टाईगर सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समता सैनिक दलात जाहीर प्रवेश केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समता सैनिक दल जिल्हा संघटक तथा विदर्भ विशेष प्रचारक अभय कुंभारे, जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे, तालुका संघटक मनोज थुल, मार्शल प्रिती आष्टेकर,रमाई नगर तालुका संघटिका मार्शला वंदनाताई वासनिक, मार्शल भारती बन्सोड आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी भिम टाईगर सेनेचे पदाधिकारी अक्षय भगत, अनिकेत भगत, अमरदीप मेहरे, नयन गायकवाड, सौरभ टोकसे, विनोद पायले आदी पदाधिकारी यांनी समता सैनिक दलात जाहीर प्रवेश घेतला.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना भिम टायगर सेनेचे अक्षय भगत म्हणाले की, समाजा तील विविध गटांच्या-तटाच्या राजकारणामुळे आजची तरूणांई त्रस्त झाली आहे. लोकांनी बाबासाहेबाच्या नावाने दुकाने थाटली आहेत. तरुणाईचा राजकारणासाठी सर्रास वापर होत आहे.या सर्व गोष्टींचा विट आलेला. आता फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित समता सैनिक दल हा एकच पर्याय उरलेला आहे.म्हणून आम्ही घर वापसी करीत समता सैनिक दलामध्ये जाहीर प्रवेश करीत आहोत आणि समता सैनिक दलास वाढविण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालणार आहोत, असे मत व्यक्त केले.
यावेळी समता सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे, जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे, तालुका संघटक मनोज थुल, पप्पू पाटील, धिरज भगत, नयन गायकवाड, अक्षय भगत, अनिकेत भगत, चंदु भगत, अमोल ताकसांडे, सुरज गणवीर, रवी बहादूरे, अनिकेत भगत, अमरदीप मेहरे, सौरभ टोकसे, विनोद पायले, भारती बन्सोड, वंदनाताई वासनिक, प्रिती आष्टेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…