मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- तालुक्यातील विविध गावात सुरू असलेल्या बोनालू उत्सवात भाग्यश्री ताई आत्राम यांनी उपस्थिती दर्शविले आहे.
सिरोंचा तालुका हा तेलंगाणा राज्याच्या सीमेवर असून तेलंगाणा राज्याशी या तालुक्याचा रोटी बेटीचा व्यवहार आहे. तालुक्यातील विविध गावांत बहुतांश सण तेलगू पद्धतीने साजरा केले जातात. नुकतेच काही महिन्यांपूर्वी बतूकम्मा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. त्यानंतर आता बोनालू उत्सव सुद्धा मोठ्या थाटामाटात सुरू आहे.
सध्या या परिसरात पोचम्मा बोनालू, लक्ष्मी देवारा बोनालू, मांतअम्मा बोनालू, महाकाली बोनालू मोठ्या उत्साहाने साजरा केले जात आहे. 9 जानेवारी रोजी माजी जि प अध्यक्ष भाग्याश्री ताई आत्राम यांनी तालुक्यातील अंकीसा, सुंकरेली आणि लक्ष्मीदेवपेठा या गावातील बोनालू उत्सवात सहभाग होऊन आशीर्वाद घेत उपस्थितांचे उत्साह वाढविले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वेंकटलक्ष्मी अरवेली, तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी तसेच विविध गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…