बेकायदेशीर रित्या कोयत्यांची विक्री करणारा विक्रेता १०५ कोयत्यांसह गुन्हे शाखेकडून अटक.

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

गुन्हे शाखा युनिट १ पुणे शहर

पुणे :- शहरामध्ये नुकतेच सिंहगडरोड पोलीस स्टेशन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, समर्थ पोलीस स्टेशन फरासखाना पोलीस स्टेशन, डेक्कन पोलीस स्टेशन हदीमध्ये नवीन तयार होणारे गुन्हेगार यांनी आपली सर्वसामान्य नागरीकामध्ये दहशत निर्माण होण्यासाठी भर दिवसा टपरी चालक, हॉटेल मालक, रोडने जाणारे नागरीक यांना धमकी वजा दहशत निर्माण होण्यासाठी हातात कोयते तलवारी घेवून वरील नागरीकांना त्यांचे हॉटेलमध्ये, टपरीमध्ये दुकानांमध्ये तसेच नागरीकांच्या दुचाकी चार चाकी गाड्यांवर कोयते मारून मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याचे व्हिडीओ काढून नागरीक व्हायरल करून नागरीकांचा जीव किती धोक्यात आहे. याबाबत मेसेज वॉस्टअप टिवटर, फेसबुक या माध्यमातून पाठवत होते. मा पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार व मा पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस अधिकारी यांची मिटींग घेवून सदर गंगवार वचक बसविण्यासाठी गुन्हे शाखेकडून वारंवार आरोपी चेकींग तसेच दररोज पेट्रोलींग नेमण्यात आली आहे व यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याबाबत सक्त पेट्रोलींग करण्याचे आदेश दिले आहेत.

वरील आदेशाप्रमाणे श्री रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे व श्री अमोल झेंडे पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, पुणे शहर यांनी गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व अंमलदार यांचे विविध टिम तयार करून गुन्हेगार कोयता गंगवर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी तसेच नागरीकांना मनमोकळेपणाने फिरता येईल याकरीता कोबींग ऑपरेशन राबविले असता, दिनांक ०२/०५/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट-१ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले व त्यांचे पथक असे युनिट-१ चे कार्यक्षेत्रात विषेश मोहिमेच्या अनुषंगाने कोबींग ऑपरेशन फिरत असताना पो हवा अजय थोरात व पो को निलेश साबळे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बुधवारपेठ, बोहरीआळी, पुणे या दुकानात हार्डवेअरचे सामान विक्रीचे नावाखाली अनाधिकृतपणे विना परवाना कोयत्याची विक्री चालू आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने मा. वपोनि श्री संदीप भोसले गुन्हे शाखा युनिट १. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-१ चे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी ताहीरआली चिल ९३०. बुधवारपेठ, बोहरीआळी, पुणे या हार्डवेअरचे दुकानात सायं. १९/३० या छापा टाकून एकुण 404 कोयते किं रु ४५८००/- चे जप्त करून अनाधिकाराने विक्री करणारा हुसन खोजेमा राजगरा वय ३२ वर्ष रा हिल्स् अॅण्ड हिल्स सोसायटी, उन्ड्री, पुणे २८ यास अटक करण्यात आली आहे. सदर इसमाविद फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुर नं ०९/२०२३. ऑर्म अॅक्ट ४/२५ महा पोलीस अॅक्ट २०(१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी मा. श्री रितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री संदिप कर्णिक सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री अमोल झेंडे पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, मा. श्री गजानन टोम्पे सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहा पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उप-निरीक्षक सुनिल कुलकर्णी, अजय जाधव, रमेश तापकीर, पोलीस अंमलदार अजय घोरात, निलेश साबळे, अमोल पवार, दत्ता सोनवणे, राहुल मखरे, विठ्ठल सांळुखे, महेश बामगुडे, शशीकांत दरेकर यांचे पथकाने केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

2 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

2 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

2 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

2 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

3 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

3 hours ago