वर्धा जिल्हा सामूहिक बलात्काराने हादळला 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन मुलांनी केला सामूहिक अत्याचार.

✒️ आशिष अंबादे,वर्धा जिल्हा प्रतिनिधी.
8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. अशीच संतापजनक घटना सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. अवघ्या १० वर्षीय मुलीला तिच्याच घराशेजारी राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांनी तलावाकडे खेचत नेत झुडपात तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या घटनेने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सावंगी पोलिसांना ही घटना कळताच त्यांच्याही पायाखालची वाळू सरकली. पोलिसांनी तिन्ही विधी संघर्षित मुलांना ताब्यात घेतले असून बाल न्याय मंडळापुढे हजर करणार असल्याचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी सांगितले.

सावंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही घरासमोरील अंगणात खेळत असताना तिच्याच घराशेजारी राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांनी तिला बळजबरीने घरामागे असलेल्या तलावाकडे खेचत नेले. तेथील झुडपांत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. तिने ही बाब तिच्या घरच्यांना सांगितली. घरच्यांनी थेट सावंगी पोलिस ठाणे गाठून याबाबतची माहिती दिली. दरम्यान पोलिस ठाण्यात हजर कर्मचाऱ्यांच्याही पायाखालची वाळू सरकली.

पीडितेच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही विधी संघर्षित बालकांविरुद्ध कलम ३६३,३७६, (एबी),३७६(२)(एन),३७६ (ड) भादंवि सहकलम ४,६ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांना बाल न्याय मंडळापुढे हजर करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी दिली. या घटनेने वर्धा जिल्हा चांगलाच हादरला आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

43 mins ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

2 hours ago