वर्धा जिल्हात नगर पालिकेतील सफाई कर्मचाऱ्याला वेतनश्रेणी लागू करण्यासाठी 10.000 हजार लाचेची मागणी.

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो .9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील सिंदी नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला वेतनश्रेणी लागू करण्याबाबत दहा हजारांची लाच मागितल असलाची तक्रार नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाली सात हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सिंदी (रेल्वे) नगरपालिकेचा वरिष्ठ लिपिक प्रकाश चांदेकर याला नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रंगेहात अटक केली. त्यामुळे संपूर्ण नगरपालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

सिंदी नगर पालिकेतील सफाई कर्मचाऱ्याला वेतनश्रेणी लागू करण्यासाठी तसेच वेतन काढून देण्यासाठी लाचखोर वरिष्ठ लिपिक प्रकाश चांदेकर याने १० हजार रुपयांची लाच मागितली. दरम्यान, तडजोड करून ९ तारखेला रोज सोमवारी सात हजार रुपये लाच स्वीकारून उर्वरित ३ हजारांची रक्कम पगारावर देण्याचे ठरले.

लाचखोर लिपिकाने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी लाचेची रक्कम स्वीकारली. दरम्यान, नागपूर येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सापळा रचून लाचखोर लिपिक प्रकाश चांदेकर याला रंगेहात अटक केली.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

57 mins ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

2 hours ago