वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- जिल्हातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एक माता आपल्याच नुसताच जन्मलेल्या पोटच्या गोळ्यासाठी वैरणी ठरली. आई ने नुसताची जन्मलेल्या आपल्या बाळाला पिशवीत घालून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकले ही घटना समोर येतात संपूर्ण पुणे जिल्हात एकच खळबळ उडाली आहे.
आई हे कुठल्याही बाळासाठी सर्वच असते. पण तीच आई आपल्या बाळाच्या जीवावर जेव्हा उठते त्यावेळी डाखिनी वैरनी ठरते. आई बाळाच्या नात्याला काळिमा फसणारी घटना आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात घडली आहे. जन्म देताच पोटच्या गोळ्याला आईनेच क्षणात अनाथ करत पिशवीत घालून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकले. नवजात बालिकेला नकोशी करणाऱ्या निर्दयी आईला सीसीटीव्ही च्या आधारवार तीन तासांत मंचर पोलीसांनी अटक केली आहे.
आज सर्विकडे बेटी बचाव बेटी पढ़ाओ… असे नारे दिला जात असताना मंचर मध्ये एका निर्दयी आईने मुलगी झाली म्हणून नवजातअर्भकाला पिशवीत घालून कचऱ्याच्या ढिगावर फेकले. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. त्यामुळे मंचर परिसरात खळबळ उडाली आहे.
वेळेत उपचार मिळाल्याने बालिकेचे प्राण वाचले. बालिकेची प्रकृती स्थिर असून माणुसकीला काळिंमा फासणाऱ्या जन्मजात्यांचा शोध घेण्याचे काम मंचर पोलिसांना यश आलं आहे. सदर बाळाला मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोमवारी दुपारीच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज चौकात बाजार पेठेत बेवारस नवजातबालक असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक अमित काटे, गौरव बारणे व अमर बारवकर यांना मिळाली. त्यानंतर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेतून नवजातअर्भकाला मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन पोलिसांना माहिती दिली.
मंचर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. तसेच परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारवार तीन तासांत मंचर पोलीसांनी आरोपी आईला अटक केली आहे.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…