महाराष्ट्र संदेश न्युज रिपोर्टर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चुरू:- राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातून एक मनहेलवणारी घटना समोर येत आहे. सर्वत्र कडाक्याच्या थंडी पडत आहे. या थंडीच्या बचाव करण्यासाठी अनेक नागरिक विविध युक्ती करतात पण अशी एक युक्ती एका कुटुंबासाठी जीवघेणी ठरली आहे.
एका कुटुंबाने मोठ्या प्रमाणात पडत असलेली थंडीमुळे घरात शेगडीत कोळसा टाकून शेकोटी केली होती. या शेकोटीमुळे खोलीत उब निर्माण झाली. मात्र, घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद असल्याने शेकोटीचा धूर घरातच राहिला. त्यामुळे, जीव गुदमरुन घरातील दोन महिला आणि एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. सकाळी इतर सदस्य झोपेतून उठल्यानंतर त्यांना तात्काळ सुखरुप स्थळी हलवण्यात आले. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चुरू जिल्ह्यातील रतनगढ पोलीस ठाणे हद्दीतील गौरीसर गावात ही घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. गौरीसर निवासी अमरचंद प्रजापत यांचे कुटुंब शेतात घर करुन राहते. अमरचंद यांचे दोन्ही मुले राजकुमार आणि केदार हे कामानिमित्त गुजरातमध्येच असतात. त्यामुळे, घरी अमरचंद, त्यांची पत्नी सोना देवी, सून गायत्री, ५ वर्षांचा नातू कमल, अडीच वर्षाची नात तेजस्वीनी आणि तीन महिन्यांचा नातू खुशी हे राहत होते. दुर्दैवाने घरात पेटवलेल्या शेकोटीच्या धुरामुळे जीव गुदमरुन कुटुंबातील सोनादेवी, गायत्री आणि चिमुकल्या तेजस्वीनीचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…