✒️मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- डोंबिवली तून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून तीन जणांनी धारदार शस्त्रानं एका तरुणाचं लिंगच कापून टाकल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. हा प्रकार डोंबिवलीत घडला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास डोंबिवलीमधील गोळवली परिसरात कौटुंबिक वादातून मोठं भांडण झालं. याच भांडणातून तीन युवकांनी रागाच्या भरात एका तरुणाचं लिंग कापल्याची घटना घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोनू राम, करण राम, सुरेंद्र राम या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पीडित तरुण संजय कुमारला मुंबईतील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे.
डोंबिवलीमधील गोलवली परिसरात एका चाळीत संजय कुमार, सोनू राम, करण राम, सुरेंद्र राम हे चार जण एका भाड्याच्या खोलीत राहत होते. हे चौघे मूळचे उत्तरप्रदेश येथील आहेत. हे चारही जण गोळवळी जवळ असलेल्या एमआयडीसी मधील एका कंपनीत काम करत होते. संजय कुमार याचे सोनू, करण, सुरेंद्र यांच्यासोबत कौटुंबिक वाद होते. काल रात्रीच्या सुमारास चौघंही घरी असताना पुन्हा त्यांच्या कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादातून संतापलेल्या सोनू, करण, सुरेंद्र याने संजयकुमार याला बेदम मारहाण केली. हे तिघे इथेच थांबले नाही तर त्यांनी सुरेंद्र आणि करण यानं संजयकुमार याला पकडलं आणि सोनूनं धारदार शस्त्रानं संजयकुमार यांचं लिंग कापलं. गंभीर जखमी झालेल्या संजयकुमार याला करण आणि सोनुनं रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात सोनू, करण, सुरेंद्र हा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना ताब्यात घेतलं असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…