✒️ संदीप सुरडकर, नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. या जगात येऊन अवघे दोनच दिवस झाले असताना सैतान बापाच्या आपल्याच 2 दिवसाचा नवजात बाळाला जमिनीवर आपटले होते. त्यामुळे ते बाळ गंभीररित्या जखमी झाले होते. अखेर 11 दिवस त्याबाळावर नागपूर मेडिकल मध्ये उपचार सुरू होता. आज त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आरोपी गिरीश महादेवराव गोंडाणे वय 32 वर्ष, सावरडी, जि. अमरावती असे या सैतानी बापाचे नाव आहे.
गिरीश महादेवराव गोंडाणे या निर्दयी सैतानी बापाने आपल्याच 2 दिवसाच्या नवजात चिमुकल्याला जमिनीवर आपटल्यामुळे त्याचावर मेडिकलमध्ये मागील 11 दिवसांपासून उपचार सुरू होते व बुधवारी सकाळी त्याचा संघर्ष संपला. आपल्या पोटचा गोळा गमाविल्यानंतर त्याच्या आईने एकच आक्रोश केला. त्यावेळी मेडिकलमधील सर्वच हळहले.
अमरावती येथील प्रतीक्षा हिचा प्रेमविवाह जुलै 2021 मध्ये आरोपी गिरीष सोबत झाला होता. तो मजुरीचे काम करत होता. गिरीश हा नेहमी प्रतीक्षाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून त्यांच्यात नेहमीच वाद व्हायचे. याच दरम्यान, प्रतीक्षा गर्भवती राहली असल्यामुळे ती अमरावतीच्या रुग्णालयात बाळंतपणासाठी गेली. तेथील डॉक्टरांनी तिला मेडिकलमध्ये रेफर केले. मेडिकलमध्ये 28 डिसेंबरला ती वॉर्ड क्रमांक 46 मध्ये भरती झाली. दोन दिवसांनी 30 डिसेंबरला तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर 31 डिसेंबरला सायंकाळी 6 ते 6.30 वाजताच्या सुमारास आरोपी गिरीश मेडिकलमध्ये पोहोचला. त्याने प्रतीक्षा भरती असलेल्या वॉर्डात जाऊन तिला हाता बुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने प्रतीक्षाजवळून दोन दिवसांचे बाळ हिसकावले आणि फरशीवर आपटून बाळाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रतीक्षाने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी गिरीश तेथून फरार झाला. बाळाच्या डोक्याला यात मोठी जखम झाली होती व तेव्हापासून लहान बाळावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू होते. बाळाला श्वास घेण्यातदेखील अडचण येत होती. निवासी डॉक्टर, परिचारिका बाळाकडे विशेष लक्ष देत होते. मात्र, अखेर बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भरत कुचेवार यांनी दिली.
बापावर हत्येचा गुन्हा दाखल.
प्रतीक्षाची आई जीवनकला यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिरीशविरोधात कलम 307, 323 नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली होती. आता त्याच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…