हिंगणघाट राष्ट्रवादी युवक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आजच्या तरूणांनी स्वामी विवेकानंदाच्या चारित्र्यातुन प्रेरणा घेऊन आपले आदर्श जीवन घडवावे व राजमाता जिजाऊ यांच्या थोरविची शिकवणूक आपल्या अंगी बाळगावे, राजमाता जिजाऊचा आदर्श अंगी बाळगल्यास त्यांच्या जीवनात कोणताही अडथळा येणार नाही असे मनोगत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस च्या वतीने राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल बोरकर, विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस अमोल त्रिपाठी, युवक जिल्हा उपाध्यक्ष सुशील घोडे, जिल्हा महासचिव राजू मुडे, जिल्हा सचिव शेखर ठाकरे, युवक विधानसभा उपाध्यक्ष प्रशांत लोणकर, हिंगणघाट तालुका उपाध्यक्ष वैभव साठोने, शहर अध्यक्ष पंकज पाके, प्रशांत मेश्राम, अनिल भुते, विपुल वाढई, निखिल ठाकरे, वैभव भुते, मनीष मुडे, अप्रित रेवतकर, अविनाश वांदिले, रोशन बावणे, क्रिश हिवसे, निखिल शेंडे, कैलास मोहिजे, साहिद शेख, रोहित सांगोळी यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

1 hour ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

3 hours ago