पाचोरा धावत्या रेल्वेखाली पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू, हे माहीत होताच काकूचाही हृदयविकाराच्या धक्काने मृत्यू.

✒️ईसा तडवी पाचोरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा/जळगाव:- जिल्हातील पाचोरा येथून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. धावत्या रेल्वेखाली पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा मृतूचा धक्का सहन न झाल्याने काकूचाही हृदयविकाराच्या धक्काने मृत्यू झाला. ही घटना पाचोरा शहरातील हनुमान नगर भागात बुधवारी रात्री घडली. काकू व पुतण्याची एकाचवेळी अंत्ययात्रा काढण्यात आली.

पाचोरा शहरातील हनुमान नगर भागातील दादाभाऊ मोरे हे काकाच्या उत्तरकार्यासाठी वरखेडी येथे परिवारासह गेले होते. ते घरी आल्यावर त्यांचा मुलगा किरण दादाभाऊ सोनार (मोरे) वय 27 वर्ष हा तारखेडा रोडकडे रेल्वे मार्ग ओलांडून जात होता. त्याचवेळी रेल्वेचा धक्का लागून तो गाडीखाली आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. रेल्वेचे लोको पायलट जे.एच. देवरे यांनी पाचोरा रेल्वे स्टेशन उपप्रबंधकांना या घटनेची माहिती दिली.

किरणच्या अचानक मृत्यूची घटना कळताच त्याच्या काकू उषाबाई मन्नू सोनार वय 40 वर्ष यांना जोरदार धक्का बसला. त्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ जळगाव येथे उपचारासाठी घेऊन जात असतानाच वाटेतच त्यांचाही मृत्यू झाला. यानंतर काकू व पुतण्यावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने हनुमान नगर भागात एकच हळहळ व्यक्त होत आहे. रेल्वे अपघाताची पाचोरा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

6 mins ago

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा निधी तात्काळ देण्यात यावा: रवि धोटे यांच्या नेतृत्वात निवेदन.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- विधानसभा २०२४ च्या निवडणूकानंतर फक्त…

17 mins ago

वाढदिवसाच्या दिवशी आईने नवीन मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून 15 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…

1 hour ago

सांगलीतील उद्योजक कुटुंबाचा बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…

2 hours ago

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

7 hours ago