राजुऱ्यात दुमदुमला “भारत माता की जय ” चा जयघोष. हजारोच्या संख्येत निघाली प्रभातफेरी.

राजुरा शहरातील शाळा कॉलेज मधील हजारो विद्द्यार्थी प्रभातफेरीत झाले सामील.

‘हर घर तिरंगा’ प्रभात फेरीचे नगर परिषद द्वारे यशस्वी आयोजन.

संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

राजुरा,6 ऑगस्ट:- खलील वृत्त माहिती प्रमाणे आहे राजुरा शहरातील शाळा महाविद्यालयाचे शेकडो विद्यार्थी प्रभात फेरीत सहभागी होऊन हर घर तिरंगा प्रभात फेरीचे नगर परिषद द्वारे यशस्वी आयोजन

संपूर्ण भारत देशात स्वातंत्र्यप्राप्ती ला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दि.13 ते 15 ऑगस्ट पर्यंत ” हर घर तिरंगा ” तसेच दि. 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान “स्वराज्य महोत्सव “राबवायचे आहे. या अंतर्गत राजुरा शहरातील शाळा, महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालयांच्या शेकडो विध्यार्थीनी ” हर घर तिरंगा ” जनजागृती प्रभात फेरीत सहभागी होऊन भारत माता की जय च्या जयघोषाने राजुरा शहर दुमदुमले.
राजुरा नगर परिषद कार्यालय येथून निघालेल्या प्रभात फेरीचा समारोप तहसील कार्यालय येथे राष्ट्रगीत गायनाने झाला. यावेळी हरीश गाडे, तहसीलदार राजुरा, बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, छोटूलाल सोमलकर, स्वच्छता दूत, संदीप जैन, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन, राजुरा शहरातील जिल्हा परिषद हायस्कुल, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, श्री शिवाजी महाविद्यालय, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल, शिवाजी हायस्कुल, इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक स्कूल, कल्याण नर्सिंग कॉलेज, श्रीमती गोपिकाबाई सांगडा पाटील आश्रम शाळा, ऍड. यादवराव धोटे महाविद्यालय, नगर परिषदेच्या विविध प्राथमिक शाळा, राष्ट्रीय नर्सिंग कॉलेज, सर्व शाळाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

या प्रभातफेरीचे सूत्रसंचालन विजयकुमार जांभूळकर, प्रशासकीय अधिकारी न. प.राजुरा यांनी केले. ही प्रभातफेरी सूर्यकांत पिदुरकर, मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आली. संकेत नंदवंशी, पाणीपुरवठा अभियंता, आदित्य खापणे, विद्युत अभियंता, उपेंद्र धामंगे, कर निरीक्षक, अश्विनकुमार भोई लेखापाल अभिनंदन काळे रचना सहाय्यक रवींद्र जामूनकर स्थापत्य अभियंता प्रीतम खडसे, सनप जोशी, अक्षय सूर्यवंशी मिळकत व्यवस्थापक, उपस्थित होते. या सर्व प्रभातफेरी च्या यशस्वितेकरिता पोलीस प्रशासन राजुरा , नगर परिषद कार्यालय राजुरा, तहसील कार्यालय, राजुरा, वनविभाग कार्यालय राजुरा , व्यापारी असोसिएशन, पंचायत समिती कार्यालय, राजुरा, विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी तथा सदस्य , नेफडोचे पदाधिकारी सदस्य यांचे सहकार्य लाभले. प्रभातफेरीच्या शेवटी उपास्थित सर्वांना नगर परिषद तर्फे बिस्कीट वितरण करण्यात आले.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

41 mins ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

1 hour ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

2 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

2 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

2 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

3 hours ago