पैनगंगा नदीवरील उच्चपातळी सात बंधाऱ्याला तत्वत मंजुरी, चंद्रपूर जिल्ह्याला मात्र ठेंगा.

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- मराठवाडा विदर्भाच्या सीमेवरून वाहनाऱ्या पैनगंगा नदीवर सात उच्च पातळी बंधाऱ्यानां राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली. यामुळे १० हजार ६०० हे.जमीन क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाला यश आल्याने मराठवाडा विदर्भात काही जिल्याला पण याचा लाभ होणार असल्याने त्या भागात शेतकऱ्यामध्ये आनंद व्यक्त होत आहे.पैंनगंगा नदी ही हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याची जीवन वाहिनी आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील औद्यौगिक विकास, पेयजल योजना, वीज निर्मिती प्रकल्प सिमेंट उद्योगाला पाणी पुरवठा योजना या नदी वर कार्यान्वित आहे. गेल्या ३ दशका पासून राजुरा,चंद्रपूर,वणी पैनगंगा नदीवर उच्च पातळी बंधारे व्हावे म्हणून मागणी आहे. नरेश पुगलिया, शिवाजीराव मोघे, प्रभाकर मामुलकर, वामनराव चटप, सुदर्शन निमकर, वामनराव कासावार, संजय धोटे माजी खासदार आमदार इत्यादी नी मागणी केली होती. सध्या शासनात असलेले आमदार सुभाष धोटे, किशोर जोरगेवार, बोतकुलवार व जिल्हयाचे कर्तबगार पालकमंत्री म्हणून ख्याती असलेले सुधीर मुनगंटीवार हयाचा मतदार क्षेत्रालगत नदीकाठावर लाभक्षेत्र लागून आहे. ही मागणी नेहमी चर्चेत राहली मात्र वनोजा, शिवणी, बॅरेज साठी पाटबंधारे विभागाने पाहणी करून प्रथम २००४ मध्ये नकाशा मंडळ नाशिक यांना प्रस्ताव दिला ते धूळ खात पडले आहे. तर घाटंजी पैनगंगा अप्पर प्रकल्प दोन दशकापासून कासवगतीने सुरु आहे. चंद्रपूर यवतमाळ जिल्हयातील शेती, उद्योग क्रांतीमुळे धोक्यात आली तर सिचंना अभावी हरीत क्रांती दिव्य स्वप्न ठरले.

प्रदूषण, तापमान, हवामान बदल यामुळे सिंचना शिवाय पर्याय नाही हि वास्तविकता असल्याने चंद्रपूर जिल्हयात शिवनी, वनोजा, परसोडा या भागात उच्च पातळीचे बंधारे निर्माण करण्याची नितांत गरज असताना एकही बंधारा मंजूर न झाल्याने शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसल्या गेले. येथे उद्योगाला लागणारे पाण्याची गरज व सिंचनासाठी लाभ होणार असल्याने उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुंनगंटीवार यांना निवेदना द्वारे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आबिद अली यांनी लक्ष वेधले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

10 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

10 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

10 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

10 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

10 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

10 hours ago