पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
दरोडा व वाहन चोरी विरोपथक१
पुणे :- दिनांक ११/०१/२०२३ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील अधिकारी व पथक असे कॉम्बिंग कारवाई करीत असताना पथकास माहिती मिळाली की, काची आळी, रविवार पेठ, पुणे येथे एक महिला नायलॉन चा मांजा विकत आहे, सदर ठिकाणी जाऊन नमूद महिलेस तिचे नाव, पत्ता विचारता तिने तिचे नाव, पत्ता नुराबानु भिकन शेख, वय ६३ वर्षे, रा. काची आळी, रविवार पेठ, पुणे असे सांगितले. नमूद महिलेकडे २०००/- रु चा बंदी असलेला नायलॉन चा मांजाच्या दोन रिळ विक्रीकरिता मिळून आल्याने तिच्या विरुद्ध खडक पो स्टे येथे भा. द. वि. कलम १८८,३३६ सह पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम ५,१५ अन्वये गुन्हा दाखल करणे कामी नमूद महिलेस खडक पो स्टे चे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सहआयुक्त श्री संदीप कर्णिक, मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री गजानन टोम्पे, मा. पोलीस निरीक्षक सुरेखा वाघमारे (अति. कार्यभार) यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि नरेंद्र पाटील, श्रेणी पो उ नि शेख, पो ना लोखंडे, पोना गणेश ढगे,म पो ना सोनावणे व पो. अं. बनकर यांनी केली आहे.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…