बीड: विवाहितेचा मृतदेह मिळाला लटकलेल्या स्थितीत, पतीला अटक, सासू-सासरे पसार.

श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड :
एका विवाहितेच्या हत्येने महाराष्ट्र पुन्हा हादळला आहे. त्यामुळे सर्विकदे संताप व्यक्त केला जात आहे. “विवाहित महिलेला वारंवार छळ व्हायचा. लग्न झालं तेव्हापासूनच घरात तिला सुखाचा एक क्षण नाही मिळाला. पति शेतात काम करायचा, तो दारू पिऊन तिला मारहाण करायचा. अनेकदा तिने आमच्या जवळ बोलूनही दाखवलं. पण ‘संसार’ करायच्या नावाखाली ती पुन्हा तिच्या कामांमध्ये व्यस्त व्हायची. आधी तिला खूप एकटं वाटायचं. पण मग तिला दोन मुलं झाली अन् या सगळ्यात आयुष्यातील 7-8 वर्षे कधी निघून गेली कधी कळालंच नाही. या काळात तिला दोन मुलं झाली. मग कितीही भांडणं झाली, मारहाण झाली तरी ती मुलांकडे बघून पुन्हा उभी राहायची. मुलांसाठी आमि मुलांकडे बघून ती त्या घरात राहत होती. पण इतके दिवस सुरु असलेल्या अत्याचाराचं टोक त्यादिवशी गाठलं गेलं. सकाळपासूनच घरात भांडणं सुरु होती. आपण वेगळं राहुयात, असं तिनं आणि तिच्या नवऱ्यानं ठरवलं. मग दुपारी चार वाजता ती आमच्या नातेवाईकांशी बोलली होती. पण पुढच्या तासाभरात आम्हाला फोन आला. तिने आत्महत्या केली. पण हे कसं शक्य आहे. तिने काहीवेळा आधी फोन केला, तेव्हा तसं काहीच जाणवलं नाही. तसं तिला काही वाटत असतं तर ती बोलली असती, रडली असती. पण तसं काहीच झालं नाही. पण मग अवघ्या तास दिड तासात असं काय झालं? तिने आत्महत्या का केली? कश्यासाठी केली? हे सगळं कसं घडलं? हे सगळे प्रश्न आम्हाला सतावताहेत. पण तिने आत्महत्या केलेली नाही तर तिची हत्या झालीये”, असं अंजना राठोडचे वडिल बन्सी पेमा पवार यांनी त्या घटनेची पार्श्वभूमी सांगितली.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडलेल्या घटनेने परिसर हळहळला आहे. गेवराईतील उमापूर गावात ठाकरी तांड्यावर अंजना सुनील राठोड यांचा झाडावर लटकलेला मृतदेह आढळला. त्यांनी आत्महत्या केल्याचं सासरी मंडळी सांगत आहेत. मात्र अंजना यांची हत्या झाल्याचा आरोप माहेरचे लोक करत आहेत. या प्रकरणी चकलांबा पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली. कलम 302, 498, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. यात अंजना यांचे पती सुनिल राठोड यांना अटक करण्यात आली आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

3 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

3 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

4 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

4 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

5 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

5 hours ago