सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार, संजयनगर सांगली येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आयु. घोरपडे मॅडम यांच्या हस्ते करून, त्रिसरणं आणि पंचशील ग्रहण केले. त्यानंतर विहाराच्या सल्लागार शिरगुप्पीकर मॅडम यांनी प्रस्तावना केली व पाहुण्याची ओळख संचालिका उषाताई कांबळे मॅडम यांनी करून दिली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक घोरपडे मॅडम यांनी जिजाऊच्या कार्याचा आढावा भारदस्त आवाजात व सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत करून जिजाऊनी शिवबा आणि शंभू राजे यांना कसे घडवली याबाबत मुद्दे सुद्ध मांडणी करून जिजाऊ समजून सांगितले. यावेळी जिजाऊच्या वेशभूषेत आलेल्या लहान लहान मुलींनी जिजाऊ सत्यात उतरवली, सदिच्छा नागवंशी हिने मोजक्याच शब्दात जिजाऊ म्हणजे काय एकदम उत्कृष्टरित्या सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन वैशाली काकडे यांनी केले व आभार प्रदर्शन आयु.भाग्यश्री नरेंद्र दांडे यांनी केले.
भीमा कोरेगाव सहल टीम आणि श्रावस्ती विहार यांच्या मार्फत भोजन दान देण्यात आले. सदरचे भोजन आयु. प्रकाश वाघमारे यांनी बनविले. सदर कार्यक्रमाचे नियोजन दिपाली कांबळे, शैलजा साबळे यांनी केले. यावेळी विहाराच्या उपाध्यक्ष सुनीता धम्मकीर्ती, संचालिका उषाताई कांबळे व अवंतिका वाघमारे तसेच चेतना नागवंशी, मालन शिरगुप्पीकर, रुचिता वाघमारे, भाग्यश्री दांडे, प्रियांका कांबळे, पल्लवी कुरणे, सपना भिसे, कोमल भिसे, नरवाडे मॅडम, अर्चना लांडगे, अर्चना माने, ज्योती लांडगे, घाडगे मॅडम, वैशाली काकडे, तुपलोंढे मावशी, धेडे मॅडम आदी असे एकूण 50 पेक्षा जास्त महिला व 25 लहान मुली असा समूह उपस्तिथ होता.
तसेच विहाराचे अध्यक्ष सुधीर कोलप सर, सचिव, पवन वाघमारे, सहसचिव भारत कदम सर, खजिनदार संभाजी माने सर, सहखजिनदार आठवले सर, संचालक चौधरी सर, घाडगे सर, विहाराचे उपासक अरुण कांबळे सर, संजीव साबळे सर, धम्मकीर्ती सर, दांडे सर, नागवंशी सर, दिपक कांबळे, राहुल कांबळे, विजय लांडगे, रणजित माने, विकास भिसे, किरण भिसे, योगेश साबळे, धेडे सर, नरवाडे सर, नरेंद्र दांडे, अजित माने, प्रकाश वाघमारे, ऋत्विक संकदरी, निवास पवार, अक्षय मागाडे, देवेंद्र कांबळे, शिवाजी पवार, विनायक लांडगे व इतर उपासक असे एकूण 130 च्या आसपास समुदाय उपस्तित होता. या सर्वांचे विहारामार्फत आभार मानण्यात आले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…