पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर
दिनांक ०९/१२/२०२२ रोजी महाराजा बियर शॉपीच्या समोरील रस्त्यावर, मेनगोपाळपटटी चौक, मांजरी बुद्रुक, पुणे या ठिकाणी ८ ते १० अनोळखी मुलांनी गैर कायदयाची मंडळी जमवुन काहीही कारण नसताना फिर्यादी व साक्षीदार तसेच इतर नागरीकांना शिवीगाळ करून दगडाने बेल्टने मारहाण करुन जखनी करुन मोटार सायकलवरुन पळुन जाताना गाडीला लावलेली कोयते हवेत फिरवत नागरीकांना आम्ही इथले नाई आहे. तुम्हाला परत येवुन बघतो असे म्हणुन दहशत निर्माण केल्याने फिर्यादी यांनी अनोळखी मुलांविरुद्ध तक्रार दिल्याने हडपसर पोलीस स्टेशन येथे गुरनं. १५५४/२०२२, भा.द.वि. कलम ३०७, ३२४, ५०४, ५०६, १४३, १४५, १४७, १४९ महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७(१) (३) १३५, भारतीय हत्यार का. ४ (२५). क्रिमीनल अॅम क ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयाचे तपासात सदर गुन्हा हा १. समिर लियाकत पठाण वय-२६ वर्षे. पुर्वी रा.स.नं. १६५. साने गुरुजी वसाहत, माळवाडी, हडपसर, पुणे सध्या रा. स.नं. ९७/६ के वैशाली हाईटस, विशाल कॉलनी, मांजरी, पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे साथीदार २) शोएब लियाकत पठाण वय २० वर्षे पूर्वी रा. स.नं. १६५ साने गुरुजी वसाहत माळवाडी हडपसर पुणे सध्या रा.स.नं. ९७/६ के वैशाली हाईटस, विशाल कॉलनी, गांजरी पुणे ३ ) गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार, वय २२ वर्षे, रा. हवालदार चाळ, महादेवनगर मांजरी, पुणे ४) प्रतिक ऊर्फ एस. के. हनुमंत कांबळे, वय २० वर्षे, रा. साई श्रध्दा पार्क गोपाळपट्टी मांजरी, पुणे ५) गितेश दशरथ सोलनकर वय २१ वर्षे, रा. ढेरे बंगला धुले कॉलनी नं. ४, मांजरी रोड, हडपसर पुणे ६)ऋतिक संतोष जाधव, वय १९ वर्षे, रा. उदय कॉलनी, रुक्मीणी निवास, महादेवनगर, मांजरी, पुणे ७) साई राजेंद्र कांबळे, वय-२०- वर्षे, रा. साई श्रध्दा पार्क अजिक्य तारा बिल्डींग, गोपाळपट्टी, मांजरी, पुणे ८ ) ऋषिकेश ऊर्फ सोन्या संजय पखाले, वय २४ वर्षे, रा. स.नं. ११५, भाऊसाहेब तुपे नगर, अंसारी फाटा साडे सतरानळी, मांजरी, पुणे ९) ऋतिक सुनिल मांढरे, वय २२ वर्षे, रा. स.नं. १५. महादेवनगर मांजरी रोड, दुर्वांकर निवास हडपसर, पुणे १० ) प्रतिक शिवकुमार सलगर, वय १९ वर्ष, रा. स.नं. २७/६/१, साईरामनगर गोपाळपट्टी, मांजरी, पुणे तसेच इतर तीन पाहिजे आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक ( ताब्यात) यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने आ.रु.१ ते १० यांना अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी नामे समिर लियाकत पठाण हा मुख्य (टोळी प्रमुख) हा त्याचे इतर साथीदार शोएब लियाकत पठाण, गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार यांचेवर पुणे शहरात वेग-वेगळ्या पोलीस ठाण्या मध्ये दरोडा, मारामारी, जबरी चोरी असे शरिराविरूध्दचे व मालाविरूध्दचे गुन्हे दाखल असुन दादा हवालदार यास यापूर्वी तडीपार करण्यात आले होते. यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी प्रस्तुत गुन्हा केला असल्याचे दिसून आलेने व वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा धजावत नसल्याने, तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२) व ३(४) चा अंतर्भाव करणेकामी हडपसर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद गोकुळे यांनी मा. विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त, परि-५ पुणे यांचे मार्फतीने मा अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. रंजन शर्मा यांना सादर केलेला होता. सदर प्रकरणाची छाननी करुन वरील टोळीविरुध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे गुरनं. १५५४/२०२२, भा.द.वि. कलम ३०७, ३२४, ५०४, ५०६, १४३, १४५, १४७, १४९, महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७ (१) (३) १३५. भारतीय हत्यार का. ४ (२५), क्रिमीनल अॅम क.३ व ७ दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२) ३(४) चा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. रंजन शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे…
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सहआयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री रंजन शर्मा, मा. विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त, परि-५, पुणे श्री बजरंग देसाई सहा पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर यांचे मार्गर्शनाखाली श्री अरविंद गोकुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर श्री दिगंबर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे). तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप-निरीक्षक, अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, पांडुळे, शाहीद शेख, हंबर्डे, दुधाळ, सोनवणे सर्व्हेलन्स विभागाचे पोलीस अंमलदार, प्रविण शिंदे, गिरीष एकोंगे यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही दुसरी कारवाई आहे..
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…