मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिन्नर: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरेजवळ खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या भीषण अपघातात जवळपास 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना सिन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे सिन्नरच्या रुग्णालयात पोहचले असून जखमी प्रवाशांची विचारपूस केली आहे.
या अपघातातील सात मृत प्रवाशांची ओळख पटली असून यामध्ये दीक्षा गोंधळी, प्रतीक्षा गोंधळी, श्रावण भारस्कर, श्रद्धा भारस्कर, नरेश उबाळे, वैशाली नरेश उबाळे, बालाजी कृष्णा मोहंती (ड्रायव्हर) अशी मृत प्रवाशांची नावे आहेत.
मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खासगी बस आणि शिर्डीकडून सिन्नरबाजूकडे जाणारा मालवाहू ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन अपघात
झाला. अपघात एवढा भीषण होता की, बसची एक बाजू पूर्णतः चक्काचूर झालेली पाहायला मिळत आहे. यामध्ये जवळपास 45 प्रवाशी या बसमध्ये प्रवास करत होते. दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकांवर सिन्नर रुग्णालयात उपचार सुरु आहे. यातील सात मृत प्रवाशांची ओळख पटली असून अद्याप तीन मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. ते सर्व अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचे समजते आहे. शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघाले होते, मात्र वाटेत भीषण संकटाला त्यांना सामोरे जावे लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केले आहे. तर दादा भुसे सिन्नरच्या रुग्णालयात पोहचले आहेत.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…