सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो.9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- रक्तदानाचे पुण्य फार मोठे आहे. रक्तदान हे जीवनदाना पेक्षा कमी नाही. असेच काही लोक वेळोवेळी रक्तदान करून अनेक रुग्णाचे प्राण वाचवत आहे. अशीच एक घटना चंद्रपूर येथील पोलिस विभागात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्या बरोबर घडली. रक्तदान करणारा हा भगवंताचे दुसरे रूपच असते हे परत एकदा सिद्ध झाले.
प्राप्त माहिती नुसार, एका पोलिस कर्मचाऱ्याचा पत्नीला नववा महिना सुरू असल्याने मेटरनिटी रुग्णालयातून पोलिस कर्मचाऱ्याला फोन आला की तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन रुग्णालयात या.. पोलिस भरती सुरू असल्याने मी पोलिस निरीक्षक परतेकी साहेबाना सांगितले. त्यानी मला लगेच घरी जायला सांगितले.. मी पत्नीला घेउन रुग्णालयात ला गेलो. डॉक्टर म्हणाले की तुमच्या पत्नीच्या शरीरात रक्त (हिमोग्लोबिन) 7 टक्के आहे. त्यामुळे प्रसूती मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तरी आपण बायकोचा ब्लड गट ओ+ असल्याने तुम्ही त्याची व्यवस्था करा. चंद्रपूर मध्ये माझे नातेवाईक नाही. मग मी माझा मित्र तुषार याला फोन लावून माझी अडचण सांगितली. त्याने 10 मिनिटात मला परत कॉल बॅक केला आणि सांगितले की दादा ओ+ ब्लड डोनर ची व्यवस्था झाली. मी लगेच ब्लड बँक ला गेलो आणि तेथे पुरुष ब्लड डोनरला शोधू लागलो. तर तेथे कोणी पुरुष डोनर दिसला नाही आणि माझ्यासमोर एक मुस्लिम मुलगी दिसत होती. मी तिला हिम्मत करून विचारले की आपण ब्लड डोनेट करायला आले आहेत काय? तिने लगेच हो म्हटले आणि तुषारच नाव सांगितले आणि मला एकदम आश्चर्यचा धक्का बसला. कारण मी मुलीना सहज ब्लड डोनेट करताना बागितले नाही आणि ही ताई माझ्या अगोदर जाऊन ब्लड डोनेट करण्यासाठी तयार होती. मी तिला आणखी विचारले तर ती म्हणाली की माझे नाव फातिमा आहे आणि मी हकीम यांची बहीण आहे. माझे भाऊ हकीम हे गरजू लोकांना ब्लड डोनेट करण्याचे काम करतात त्यांची चंद्रपूर शहरात एक चैन आहे. हकीम भैय्यानी मला सांगितले की एका पोलिस ऑफिसरच्या पत्नीला रक्ताची गरज आहे. त्यासाठी तू स्वतःच जा आणि मी लगेच येतो. मी विचार केला की आजकाल टीव्ही वर फक्त हिंदु मुस्लिम याच विषयावर चर्चा जाणीपूर्वक घडवून आणताना दिसत असताना तसेच सोशल मीडिया वरती सुधा लोक हिंदु मुस्लिम मध्येच भारताची विभागणी करत असताना चंद्रपूर सारख्या शहरात हकीम भैय्या आणि त्यांची भगिनी फातिमा हे कोणताही जातीय भेदभाव न करता आपले ब्लड गरजू लोकांना डोनेट करून हे सांगून पाहत आहे. हिंदु मुस्लिम चे रक्त एकच आहे त्यामध्ये कोणताही फरक नाही. आपण उगीच जातीय भेद बाळगत आहो.
फातिमा दिदिने सांगितले की आमचा फक्त एकच धर्म आहे माणुसकी धर्म आहे. सलाम तुमच्या कार्याला फातिमा दीदी आणि हकीम भैया.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…