खेड तालुक्यातील महिलांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश, महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित.

नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन खेड:- महिला पदाधिकाऱ्यांनी केवळ प्रचारापुरते मर्यादित न राहता महिला सक्षमीकरण, शहराचा विकास व महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, महिलांचे प्रश्न ज्वलंतपणे मांडावेत. या कामी तुमच्या पाठीशी तुमचा भाऊ म्हणून मी सदैव उभा राहील असे प्रतिपादन बाळासाहेबांची शिवसेना पक्षात नवनियुक्ती दिलेल्या खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील महिला पदाधिकाऱ्यांशी बोलताना व्यक्त केले. खेड महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी सौ.ज्योती केशव आरगडे यांच्यासह विविध महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित केले.

यावेळी उपस्थित महिलांशी संवाद साधताना सांगितले की, शिरूर लोकसभेतील ५०० महिला पदाधिकाऱ्यांची स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी भेट घडवून महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. दि. १९ फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी १३.९० कोटी रकमेच्या राजगुरुनगर पंचायत समिती इमारत भूमिपूजनासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागात मोठमोठे उद्योग निर्माण व्हावे त्यासाठी प्रयत्नशील राहावे मी त्यांना सर्वोतोपरी मदत करेल असे यावेळी सांगितले.

शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, तालुकाप्रमुख राजूशेठ जवळेकर, सांडभोरवाडी काळुस जिल्हा परिषद गटाचे शिवसेना विभाग प्रमुख प्रशांत गाडे, खरपुडी खुर्द गावच्या सरपंच सौ.वनिता प्रशांत गाडे तसेच राजगुरुनगर शहरातील नयना झनकर यांचा नेतृत्वाखाली असंख्य महिला उपस्थित होत्या. यावेळी पुजा राक्षे, मिनाक्षी पवार, यशोदा चिमटे, शोभा वाळुंज, गीता भोगटे, स्वप्नाताई कुलकर्णी, सुनिता सांवत, मनिषा घुमटकर, पुष्पाताई टकले, सुनिता वाळुंज, वनिता आढारी, सुभद्रा जन्झरे, निशा भिंगारकर, आश्विनी शेळके, अनिता गुंजाळ, आशा वनघरे, मंजु भालेकर, गीता शिंदे, अलकाताई माने या सर्वांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला.

यावेळी जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, युवासेना तालुकाप्रमुख विशालआप्पा पोतले, महिला आघाडी तालुका संघटीका ज्योतीताई अरगडे, शिवसेना उपतालुका प्रमुख अंबर सावंत, शिवसेना विभागप्रमुख राहुलशेठ थोरवे, युवासेना उपतालुका प्रमुख योगेशभाऊ पगडे, युवासेना उपतालुका प्रमुख सचिनभाऊ चोधरी, युवासेना उपतालुका प्रमुख संदिपशेठ काचोळे, रोहकल गावच्या सरपंच प्रमिलाताई संदिपशेठ काचोळे, शेतकरी सेना उपविभाग प्रमुख प्रविणशेठ ठाणगे, वाहतूक सेना उपविभाग प्रमुख विकास थोरवे, चर्होली शिवसेना शाखाप्रमुख संदिपशेठ पगडे आदी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

2 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

14 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

14 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

14 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

14 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

14 hours ago