मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- केंद्र सरकार आणि राज्य सरकार बेघर आणि झोपडपट्टी मधील परीवरानसाठी प्रधानमंत्री घरकुल योजना सह अनेक योजना सुरू केल्या आहे. पण कांदिवली पूर्व कडील झोपडपट्टी मधील अनेक परिवार आपल्या हक्काच्या घरासाठी लढत आहे. आंदोलन करत आहे. त्यामुळे अशा घरकुल योजनावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. कांदिवली पूर्व येथील दामू नगर, भीम नगर मधील झोपडपट्टी मधील नागरिकांनी आपल्या मागण्यासाठी दलीत पँथरचे मुंबई अध्यक्ष रवी हिरवे यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली पूर्व येथे उपोषण करण्यात आले आहे.
दामू नगर, भीम नगर मध्ये झोपडपट्टी रहिवासीयां साठी राज्य सरकारने त्याच ठिकाणी पुनर्वसन करून स्थानिक रहिवाशांना घर द्यावे या लढ्यासाठी दलीत पँथरचे मुंबई अध्यक्ष रवी भाई हिरवे व यांचे सहकारी आणि दामू नगर, भीम नगर मधील रहिवासी महिला आणि पुरुष हे गेल्या एक महिन्यापासून थंडीच्या कडाक्यात उपोषणाला बसले आहे. सरकारने तात्काळ या प्रकरणी दखल घेऊन येथील स्थानिक रहिवाशी यांच्या झोपडपट्टी चा प्रश्न लवकरात लवकर मार्गे लावावा व त्यांना न्याय द्यावा येथील नागरिकांना संपूर्ण मूलभूत सुविधा सरकारने तात्काळ द्याव्यात दलीत पँथर मुंबई अध्यक्ष रवि भाई हिरवे हे येथील स्थानिक रहिवाशी यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी हे आंदोलन आम्ही लढत आहे असे सांगितले.
२००० रोजी कांदिवली पूर्व येथे जी पक्की घर कोसळली होती. त्या घरांच्या पुनर्वसन करिता तेथील स्थानिकांनी सरकारी खात्यात पैसे जमा केले असता. त्यातील काहिक लोकांना २०१० रोजी चांदिवली संघर्ष नगर येथे घर देण्यात आले. परंतु त्यातील काहिक लोकांना पैसे देऊनही अद्याप सरकार कडून घरे मिळालेली नाहीत.
सन २००६ मध्ये पावसामुळे जो पूर आला होता त्यात तेथील स्थानिकांचे संपूर्ण घरे वाहून गेली होती. त्यात त्यांचे खूप नुकसान झाले होते. परंतु अद्याप सरकार कडून काहीही मदत मिळालेली नाही. असे तेथील स्थानिकांचे म्हणणे आहे. तेथील स्थानिक नगरसेवक व तेथील आमदार ही या लोकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्या मुळे दलीत पँथरचे मुंबई अध्यक्ष रवी हिरवे यांच्या नेतृत्वाखाली तेथील स्थानिकांना न्याय मिळे पर्यंत त्यांनी उपोषण घेतले आहे. ७ डिसेंबर ते ७ मार्च पर्यंत उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणाचा कालावधी हा ४ महिन्याचा ठरवलेला आहे. आणि आज उपोषणाचा ३७ वा दिवस आहे.
उपोषणाला इतके दिवस होऊन ही प्रशासन कुंभकर्णी झोपेचे सोंग घेवून आहे. सरकारने आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं असल्या सारखं चित्र दिसून येत आहे. जो पर्यंत आम्हाला आमच्या हक्काचे घर मिळत नाही आम्ही आंदोलन करत राहू अशी माहिती आंदोलकानी महाराष्ट्र संदेश न्युज ला दिली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…