नागपूर: दिव्यशक्ती असल्याचा दावा करणाऱ्या धीरेंद्र कृष्ण महाराज निघाला भोंदूबाबा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली पोल खोल.

✒️संदीप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आज भोंदू बाबा आणि महाराजांचे मोठे पीक आले आहे. असे भोंदू बाबा महाराज बोल बच्चन देऊन अनेक नागरिकांना फसवत आहे. अशीच एक घटना नागपूर येथून समोर आली आहे. ‘दिव्यशक्ती’ असल्याचा दावा करणारे तरुण धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ३० लाख रुपयांचे आव्हान न स्वीकारताच नागपूरच्या रेशीमबाग मैदानातून पळ काढला आहे. त्यामुळे तरुण धीरेंद्र कृष्ण महाराज हे भोंदू महाराज असल्याचे सिद्ध झाले आहे.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान न स्वीकारता तरुण धीरेंद्र कृष्ण भोंदू महाराज हा पळून गेला. त्यामुळे परत एका भोंदूबाबांची पोलखोल नागपूर शहराने केली आहे. या भोंदू विरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार तातडीने गुन्हा नोंदवून अटक करावी, अशी मागणी आपण नागपूरच्या पोलिस आयुक्तांकडे केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सरकारच्या जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार, कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितली.

प्रा. श्याम मानव म्हणाले, धीरेंद्र कृष्ण, बागेश्वर धाम, जिल्हा छत्तरपूर, मध्य प्रदेश यांनी दिव्य दरबारात केलेल्या ‘चमत्कारिक दाव्यासंबंधी’ ‘जादूटोणा विरोधी कायदा २०१३ व ड्रग अँड मॅजिक रेमेडिज ॲक्ट – १९५४ या दोन्ही कायद्यांनुसार गुन्हा ठरू शकणारे दिव्य दरबार व्हिडीओज (युट्युबवर उपलब्ध असलेले) व नागपुरातील कार्यक्रमांमधील सारे पुरावे लिखित स्वरूपात व व्हिडीओ स्वरूपात ८ जानेवारी २०२३ ला कार्यवाही करण्याच्या विनंतीसह वरिष्ठ पोलिसांना दिले. परंतु, तीन दिवस लोटूनही साधा गुन्हा दाखल झाला नाही.

दिव्यशक्ती स्वत: असल्याचा दावा जाहीररीत्या करणारे धीरेंद्र कृष्णांनी पळ काढला असल्यामुळे ते भोंदू आहेत, हे सर्व जनतेने ओळखावे व स्वत:ला फसवणुकीपासून वाचवावे. दिव्य शक्तीच्या दाव्यांना नागरिकांनी फसू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पत्रपरिषदेला हरीश देशमुख, सुरेश झुरमुरे, प्रशांत सपाटे, छाया सावरकर आदी उपस्थित होते.

आयोजकांवरही गुन्हा दाखल व्हावा.
अशा प्रकारच्या भोंदूबाबांचे कार्यक्रम आयोजित करून सामान्य नागरिकांना अंधश्रद्धेच्या खाईत ढकलणाऱ्या आयोजकांवरही कारवाई व्हावी, जेणे करून समाजात अंधश्रद्धेला खत पाणी मिळणार नाही. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

अंनिस करणार आंदोलन, १९ ला जाहीर सभा.
जादूटोणा विरोधी कायद्याची अंमलबजाणी व्हावी, यासाठी अंनिसतर्फे आंदोलन केले जाईल. याची सुरुवात येत्या १९ जानेवारी रोजी जाहीर सभेने केली जाईल. श्री गुरुदेव सेवाश्रम येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित या सभेत धीरेंद्र कृष्ण महाराजांची पोलखोल केली जाईल. तेव्हापर्यंत पोलिसांनी कारवाई केली तर ठीक, नाही तर त्यांचीही पोलखोल करू, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

4 mins ago

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा निधी तात्काळ देण्यात यावा: रवि धोटे यांच्या नेतृत्वात निवेदन.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- विधानसभा २०२४ च्या निवडणूकानंतर फक्त…

15 mins ago

वाढदिवसाच्या दिवशी आईने नवीन मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून 15 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…

1 hour ago

सांगलीतील उद्योजक कुटुंबाचा बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…

2 hours ago

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

7 hours ago