हिंगणघाट पत्रकार संघाची नवनियुक्त कार्यकारणी गठित.

✒️मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पत्रकार संघ हिंगणघाटची नवनियुक्त कार्यकारणी नुकतीच गठित करण्यात आली. गांधी वार्ड येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. किरण वैद्य हे होते. यावेळी सर्वानुमते पत्रकार संघाची कार्यकारणी घोषित करण्यात आली.

हिंगणघाट पत्रकार संघाच्या सचिवपदी ॲड. इब्राहीम बक्ष आझाद यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी मुकेश चौधरी व शंकर शिंदे यांची निवड करण्यात आली. सहसचिव मलक मोहम्मद नईम, कोषाध्यक्ष शुभम कोचर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या कार्यकारणी सदस्यपदी भास्कर कलोडे, प्रा. संदीप रेवतकर, दीपक सुखवाणी, राजेश कोचर, अब्दुल रज्जाक व सुरेंद्र बोरकर यांची निवड करण्यात आली.

हिंगणघाट पत्रकार संघाच्या नवनियुक्त कार्यकारणीचे मोहम्मद रफीक, प्रदीप आर्य, जगदिशप्रसाद शुक्ला, प्रदीप नागपूरकर, रवी येनोरकर आदींनी अभिनंदन केले आणि पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यापूर्वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. वैद्य यांनी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अखेरला सर्व उपस्थितांचे आभार सचीव ॲड. इब्राहीम बक्ष आझाद यांनी मानले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

1 hour ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

3 hours ago