पोलिस असल्याची बतावणी करून लहान मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या तोयत्या पोलिसाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवी मुंबई:- एका अल्पवयीन मुलीवर पोलिस असल्याची बतावणी करून या तोयत्या पोलिसांनी अत्याचार केला होता. त्या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे.

नवी मुंबई आयुक्तालया मधील नेरूळ पोलीस ठाणेच्या हद्दीत एका मुलीवर अत्याचार प्रकरणी गु.र.नं. ४९१/२०२२ भादवि.३७६,५०६, पोक्सो ४ प्रमाणे दाखल गुन्हा करण्यात आला होता. बालाजी उघान येथे टुश्यन संपल्यानंतर एक अल्पवयीन मुलगी तिच्या मित्रांबरोबर रात्री 8.30 वा येथे बसली असतांना यातील आरोपी याने त्या मुलांना धमकावुन त्यांना तो पोलीस असल्याचे सागितले पैसे मागितले परंतु त्या मुलाकडे पैसे नसल्याने आरोपीने त्यामुलीवर लैंगिक अत्याचार केला म्हणुन तक्रार दाखल करण्यात आली सदरचे गांभीर्य ओळखून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त, मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त मोहिते, अपर पोलीस आयुक्त गुन्हे महेश घुर्ये, पोलीस उपआयुक्त गुन्हे अमित काळे यांनी दिलेल्या सूचना व आदेशाप्रमाणे सहा. पोलीस आयुक्त विनायक वस्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनखाली कक्ष 3 गुन्हे शाखेकडून वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी ह्यांनी गुन्हा घडलेपासून समांतर तपास सुरू होता.

पण गुन्ह्यातील आरोपीने कोणताही पुरावा ठेवला नव्हता त्याबदल काही एक उपयुक्त माहिती प्राप्त होत नव्हती पिडीत हिने गुन्हा करणारा याने तो पोलीस असल्याचे सांगितले होते म्हणून रायगड ठाणे नवी मुंबई मुबंई यातील अशाप्रकारचे गुन्हे करणारे पोलीस बदल माहिती घेत असतांना आरोपीचे वर्णन हे संतोष नरवाडे शी मिळते जुळते असल्याचे लक्षात आले होते. दरम्यान गुन्ह्याचे घटनास्थळ परिसरातील सुमारे 35 ते 40 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, अभिलेखावरील आरोपी तसेच तांत्रिक तपासाआधारे गोपनीय माहिती मिळवून मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच औरंगाबाद येथे संपर्क साधून संशयित आरोपी इसम नामे संतोष सर्जेराव नरवडे याचे बाबत तांत्रिक व गोपनीय माहिती कौशल्यपूर्ण रीतीने माहिती प्राप्त करण्यात आलेली होती. सदर आरोपी विरूध्द याअगोदर अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असल्याने व तो पोलीस दलात होता म्हणून त्याने गुन्हा करतांना कोणताही पुरावा राहणार नाही याची काळजी त्याने घेतली होती व तो कायम मोबाईल बंद ठेवत होता तो कोणाचेही संपर्कात नव्हता तरी सदर माहितीचे आधारे कक्ष ३ चे तपास पथकाने दि.२ जानेवारी रोजी पासून दिवस रात्र सातत्याने अंधेरी परिसरात कार्यरत राहून नमूद आरोपीस दि.०६ जानेवारी रोजी ताब्यात घेण्यात आलेले होते. नमुद आरोपीबाबत कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपास केला असता त्याचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे दिसून आलेले आहे.

परंतु सदर आरोपी पोलीस कस्टडीत असतांना गुन्ह्याची कबुली देत नव्हता याअगोदर NRI पोलीस ठाण्यात त्याचे विरूध्द दाखल गुन्हयात त्याने कबुली दिली नसुन तो कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नव्हता त्याला वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी व एपीआय ईशान खरोटे ह्यांनी विश्वासात घेऊन त्याची सखोल विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा कसा केला याबद्दल सविस्तर तंतोतंत फिर्यादीतील हकिकत प्रमाणे खरी हकिकत सांगितली सध्या आरोपी हा पोलीस कोठडीत आहे.

हा गुन्हयात आरोपीनी कोणताही पुरावा ठेवला नसल्याने काहीएक उपयुक्त माहिती मिळत नसल्याने गुन्हा उघडकीस आणणेबाबत नवीमुबंई पोलीसासमोर मोठे आव्हान होते. पोलीस आयुक्त मिलिंद भांरबे ह्यानी क्राईम ब्रँच ला तपास करण्याचे आदेश दिले. सहपोलीस आयुक्त महेश धुर्य यांनी पोलीस उपायुक्त अमित काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांचे नेतृत्वाखालील युनिट 3 चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना संमातर तपास करणेबाबत सुचना दिल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ईशान खरोटे सागर पवार व अंमलदार यासर्वानी दिवस रात्र सदर गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अटक केली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

4 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

4 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

5 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

5 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

5 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

5 hours ago