कोथुळणा येथील राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम त्वरीत सुरू करा, संतप्त गावकऱ्यांनी केले चक्का जाम आंदोलन.

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- रामटेक या राष्ट्रीय महामार्गावरील कोथुळणा गावाजवळील बस स्थानक येथील अनेक वर्षापासून 200 मीटर सिमेंट रस्त्याचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करा. या मागणीबद्दल नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवार 13 जानेवारीला कोथुळणा स्थानक परिसरात संतप्त नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले.

सावनेर- रामटेक या राष्ट्रीय महामार्गाचे हे सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले. पण कोथुळणा गावाजवळ 200 मीटरच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून करण्यात आलेले नाही. त्यामुळे हा रस्ता अपघातास कारणीभुत ठरत आहे. रस्त्यावरील वाहतुकीमुळे गावालगत दुकानदार व नागरिकांच्या घरांत धुळ जात असल्यामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावाजवळील रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून कोथुळणा ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग विभागास वारंवार निवेदन देण्यात आले.पण याबाबीकडे त्यांनी हा दुर्लक्ष केले. वारंवार निवेदन देऊन ही रस्त्याच्या कामाकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुर्लक्ष केल्याने संतप्त गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग अडवून चक्का जाम आंदोलन केले.

त्यामुळे तीन तास वाहतुक खोळंबुन राहली. यावेळी खापा पोलीसांचा कडक बंदोबस्त होता. यावेळी शेकडो नागरीक रस्त्यावर उतरले होते. अखेर राष्ट्रीय महामार्ग शाखा अभियंता किरण मुन यांनी आंदोलनस्थळी पोहचुन गावकऱ्यांची समजुत काढत एका महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्ते शांत झाले व आंदोलन स्थगित करण्यात आले. जर एक महिन्यात रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले नाही तर तरपुढील महिन्यात 14 फेब्रुवारी ला याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला.

याप्रसंगी बडेगांव जि.प.च्या सदस्या छाया बनसिंगे, कोथुळणा सरपंच गीता आमगांवकर, हरिश चौधरी उपसरपंच कोथुळणा, डॉ. प्रकाश लांजेवार, यादराव चौधरी, अनिल कडू, प्रशांत कोलते, धनराज चौधरी, रजत लांबट, ऊज्वला लांजेवार, देवेंद्र गाडगे, उपसरपंच निमतलाई, ललित चौरेवार सरपंच किरणापुर, गणेश काकडे प.स.सदस्य, दिपक काकडे आदि शेकडो ग्रामस्थांची ऊपस्थिती होती.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

2 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

2 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

3 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

3 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

3 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

3 hours ago