वर्धेमध्ये नात्याला काळीमा! मुलांनी जिवंतपणी जन्मदात्या वयोवृद्ध माता पित्याला सोडले स्मशानभुमीत.

✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा जरी
मो. न. 8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. ज्या माता पित्याने जन्म दिला लहाण्याचे मोठे केले त्याच मुलाने जिवंतपणी आपल्या जन्म देणाऱ्या आई बाबा ना नरकयातना दिल्या त्यामुळे संपूर्ण जिल्हात संतपव्यक्त करण्यात येत आहे.

महादेव अलाट वय 85 वर्ष व त्यांच्या पत्नी मंजुळा अलाट वय 68 वर्ष वृद्ध दाम्पत्य राहत होते. रेल्वे खात्यामधून महादेव हे निवृत्त कर्मचारी आहेत. त्या दोन वृद्ध दाम्पत्यला अनिल आणि सुनिल अशी दोन मुल आहेत. मात्र त्यांच्या थोरल्या मुलाने त्या वृद्ध दाम्पत्याला घरा बाहेर काढलं होत. तर धाकट्याने त्यांना स्मशानभूमीत नेऊन सोडलं होत.

वृद्ध दाम्पत्याची राष्ट्रीय महिला परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विचारपुस केली तेव्हा त्यांना हा सर्व प्रकार काळाला होता. वृद्ध दाम्पत्याने सांगितले कि, मोठ्या मुलाने त्यांना घराबाहेर काढले आणि लहान मुलाने त्यांना स्मशानात आणून सोडले. त्यामुळे संतापून राष्ट्रीय महिला परिषदेच्या कार्यकर्त्यांनी वृद्ध दाम्पत्याच्या हक्कांसाठी त्यांना पोलिसांमध्ये नेऊन त्यांच्या मुलांविरोधात तक्रार केली दाखल केली.

पोलिसांना मुलांना समज दिली. त्यानंतर त्या  वृद्ध दाम्पत्याला पोलीस पुन्हा घरी घेऊन गेले होते. त्यावेळी घराला कुलुप लावलेले दिसले. कुलूप तोडून घरात प्रवेश केल्यावर पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्यांच्या मुलाने आई-वडिलांचे कपडे जाळून टाकले होते. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर हिंदू धर्मामध्ये त्यांचे कपडे जाळले जातात. मात्र, येथे परिस्थिती वेगळी होती.

आईवडिल जिवंत असताना देखील मुलांनी हे घाणेरडे कृत्य केले होते. निवृत्तीनंतर त्या वृद्ध वडिलांना पेन्शन सुद्धा भेटत होती. असे असून देखील मुलांनी त्या वृद्ध आई वडिलांचा मानसिक व आर्थिक चाळ केला होता. त्यानंतर त्यांना घराबाहेर  काढलं होते. मात्र पोलिसांमुळे त्या वृद्ध दाम्पत्याला त्याचे हक्काचे घर मिळाले होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

सांगलीतील उद्योजक कुटुंबाचा बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…

24 mins ago

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

5 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

7 hours ago