विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नेवासा:- गेल्या काही वर्षापासून ख्रिस्ती समाजावरती सातत्याने ठीक ठिकाणी अन्याय, अत्याचार होत आहे. कधी धर्मांतराचा आरोप, कधी प्रार्थना स्थळांची तोडफोड, चर्च मधील साहित्याची तोडफोड व नासधुस, बायबल ग्रंथाची विटंबना, इतकेच नव्हे तर चर्च मध्ये विधी चालू असताना धर्मगुरू व समाज बांधवांना मारहाण करणे. या सारख्या घटकांचा ख्रिस्ती समाज बळी पडत आहे.
मुंबई, सांगली आडपाडी, राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी, आळंदी, छत्तीसगड मध्ये अनेक ठिकाणी वारंवार घडणाऱ्या घटना सर्वदूर देशभर प्रत्ययाला येत आहे. संविधानाने दिलेला अधिकार कायद्याने अधोरेखित केलेले स्वातंत्र्य देशभारतील समस्त नागरिकांच्या कल्याणासाठी असणारे शासन इत्यादी गोष्टीसाठी ख्रिस्ती समाजावर का अन्याय व अत्याचार हा मोठा प्रश्न आहे. तरीही कृपया सर्व धर्मियांना सोबत घेऊन काम करत आहात. ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु ख्रिस्ती समाजावर दिवसेदिवस आत्यचारच्या वाढत्या प्रमाणमुळे समाजामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. तरीही राज्यात व देशात ख्रिस्ती समाजावर होणारे हल्ले दिला जाणारा त्रास. समाजाला अस्थीर करण्याचा होणारा प्रयत्न याकडे जाणिवेने पहावे व ख्रिस्ती समाजाला आभय द्यावे. समाज कंटकाचे निर्दालन व्हावे, समाजाला शोभक होण्यापासून वाचवावे तरी आपणास कळकळीची विनंती आहे की, कृपया ख्रिस्ती समाजावर होणाऱ्या अन्याय, आत्याचाराची दखल घेवून ही विनंती केली.
दि.13 जानेवारी ला जल साधारण मंत्री आमदार शंकरराव गडाख याना तालुका पास्टर फेलोशिप यांनी निवेदन देत त्यांच्याशी चर्चा केली तसेच नेवासा पोलीस निरीक्षक यांना ही निवेदन दीले. तसेच तहसीलदार याना ही निवेदन दिले. या प्रसंगी तालुका पास्टर फिलोशीप अध्यक्ष पा. प्रकाश चक्रनारायण, उपाध्यक्ष पा.किशोर बोरगे, सल्लागार पा. सदाशिव चव्हाण, पा. संजय गोरे, सचिव पा. सुभाष चक्रनारायण, पा. शाहरुख पठाण, पा. रावसाहेब नवगिरे,पा. डॅनियल साळवे , पा. संभाजी देडे, पा. संजय सरोदे, पा.विजय गोर इत्यादी धर्मगुरू उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…
View Comments
Praise the Lord