शिधापत्रिकेवरील स्वस्त धान्य आता पूर्णपणे मोफत, दुकानदाराने पैसे मागितले तर होणार परवाना रद्द.

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो .9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- महाराष्ट्र शासनाने जीआर जारी करून लाभार्थ्यांना मोफत शिधापत्रिकेवर धान्य देण्याची घोषणा केली आहे. तरी वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील काही रेशन दुकानदार नागरिकां कडून पैसे घेऊन शिधापत्रिकेवरील धान्य देत असल्याची माहिती नागरिकांकडून समोर आली आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना २ रुपये किलो दराने गहू आणि ३ रुपये किलो दराने तांदूळ दिला जातो. मात्र, करोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरजूंची उपासमार होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत धान्याची योजना जाहीर केली. राज्य सरकारने एक महिना आणि केंद्र सरकारने दोन महिने असे तीन महिने मोफत धान्य देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, वेळोवेळी या योजनेची मुदत वाढविण्यात आली. डिसेंबर २०२२पर्यंत मोफत धान्य आणि स्वस्त धान्याचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घेतला.

अंत्योदय गटातील नागरिकांना एका शिधापत्रिकेवर ३५ किलो धान्य दिले जाते, आणि प्राधान्य गटातील नागरिकांना प्रतिव्यक्ती ५ किलो याप्रमाणे धान्य वितरित केले जाते. १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीसाठी हा निर्णय लागू राहणार असल्याचे पुरवठा शाखेकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्र शासनाने दिनांक ३० डिसेंबर २०२२ रोजी एक जीआर जारी करून सर्व शिधापत्रिकेवरील लाभार्थ्यांना मोफत शासकीय धान्य देण्याची घोषणा केली आहे. त्या आधारे महाराष्ट्रामधील सर्व पात्र अंत्योदय व प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड धारकांना एक जानेवारीपासून धान्य पूर्णपणे मोफत झालेले आहे. शिधापत्रिकेवरील धान्य घेण्यासाठी कोणीही एक रुपया रेशन दुकानदार यांना देऊ नये व कोणत्याही रेशन दुकानदाराने पैसे मागितले तर त्याला हा जीआर दाखवावा. पावती देत नसल्यास ऑनलाईन किंवा ऑफलाईन तक्रार दाखल करावी.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

वाढदिवसाच्या दिवशी आईने नवीन मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून 15 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…

11 mins ago

सांगलीतील उद्योजक कुटुंबाचा बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…

42 mins ago

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

6 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

7 hours ago