मित्राचा खून करून पसार झालेल्या आरोपीस चोवीस तासाचे आत रावेत पोलीस स्टेशन चे तपास पथकाने पुनावळे येथे सापळा रचून केली अटक.

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

रावेत पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

पुणे :- दि. ०३/०१/२०२३ रोजी ते दि ०४/०१/२०२३ रोजी ०९.४५ या दरम्यान इसम नामे राजेश शिवलिंग जाधव वय ३८ वर्ष रा बिजली नगर चिंचवड याचा खुन झाल्याबाबत तेथील जागा मालक नामे विकास प्रकाश जाधव वय ३६ वर्ष रा रात गावठाण यांनी फिर्याद दिल्यावरून रावेत पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ०९/२०२३ भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला नमुद मयत झालेले इसमाचे घटनास्थळी मोबाईल मिळुन आला नाही. तसेच मयत इसमाचा सोमनाथ सुभाष बढदाळे हा मित्र असल्याचे माहिती प्राप्त झाली. मयताचे मोबाईल आरोपी घेऊन गेला असल्याचा संशय आल्याने तांत्रीक तपासा द्वारे व आसपासचे राहणारे इसमाकडे तपास केला असता मयताचा मित्र सोमनाथ सुभाष बडदाळे याचेवर संशय आल्याने त्याचा शोध घेत असताना सायंकाळी १०.३० वा सुमारास कोयते वस्ती पुनावळे येथून आरोपी हा पायी चालत जात असताना दिसल्याने त्यास गुप्त बातमीदाराने ओळखुन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना इशारा केला तेव्हा त्यांनी सावध होवून आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सोमनाथ सुभाष बडवाळे वय ३८ वर्ष रा. सध्या आकुर्डी स्टेशन वर मोकळया जागेत आकुर्डी ता हवेली जि पुणे मुळ पत्ता देवी नगर आळंद रोड गुलबर्गा जि-गुलबर्गा राज्य कर्नाटक असे सांगितल्याने तपास पथकाची खात्री झाली की, व त्याचे ताब्यामध्ये मयताचा मोबाईल मिळुन आल्याने रावेत पो स्टे गु.र.नं. ०२ / २०५३भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणेच्या दाखल गुन्हयातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच सदर आरोपीकडे चौकशी केली असता आरोपी याने सदरचा गुन्हा हा आरोपी 4 त्याचा मित्र या दोघांमधील पूर्व वैमण्यास्यातून व दारू पिण्याच्या वादा वरुन मयत मित्रास धक्का देवुन खाली पाडुन त्याच्या डोक्यात सिमेंट चा ब्लॉक घालून त्यास गंभीर जखमी करून त्यास संपवुन टाकण्याच्या इरादयाने खुन केला असल्याचे त्याने कबुल केल्याने त्यास ताब्यात घेवून रावेत पोलीस स्टेशन येथे घेवुन येवून त्यास दाखल गुन्हयात दि ०५/०१/२०२३ रोजी २०:२५ वा अटक करण्यात आली आहे

सदर कामगीरी मा श्री विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त सो. पिं चिं. शहर, मा.श्री मनोज लोहीया सह पोलीस आयुक्त सो. पिंचिं शहर, मा. श्री संजय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त सो विचि शहर, मा. श्री. काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त सौ परि-०२ पिं चिं शहर. मा. श्री पदमाकर घनवट सहाय्यक पोलीस आयुक्त सो देहुरोड विभाग पिं चि शहर, मा. श्री शिवाजी गवारे पनि सोो. रावेत पोलीस ठाणे पिं चि शहर यांच्या मार्गदर्शना खाली तपास पथकातील श्री विशाल जाधव सपोनि सो रावत पोलीस ठाणं, श्री. परवेज शिकलगार सपोनि पोहवा / ४२५ कोळगे, पोहवा/४७२ तिटकरे, पोशि/ १६८१ जाधव, पोशि/ २३४९ राउत, पोशि/ २१६० तांबे, पोशि/ २४८६ ब्राम्हण, पोशि/२२२७ वाकडे, पोशि/ १३०९ रणदिवे, पोशि/ १६७९ देवकर यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

11 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

12 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

12 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

12 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

12 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

12 hours ago