श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त,सरपंच परिषद महाराष्ट्र मुंबईचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त,बीड जिल्हा परिषदेचा दोन वेळा जिल्हास्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त, नॅशनल नोबेलटी पुरस्कार प्राप्त, उत्कृष्ट प्रशासन पुरस्कार प्राप्त अशा विविध पुरस्काराने सन्मानित झालेले व बीड तालुक्यातील कोळवाडी या गावाला आदर्श गाव बनवण्यामध्ये मोठे योगदान असणारे व या गावामध्ये लोक सहभागातुन ग्रामपंचायत स्तराव रील विविध अभियाने, स्पर्धा मध्ये सहभागी करून अनेक पुरस्काराने कोळवाडी गावाला सन्मान मिळवून देणारे आदर्श ग्रामसेवक सखाराम काशिद यांची अखिल भारतीय वैद्यकीय संस्थेकडून देण्यात येणाऱ्या भारत भूषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पुढील काही दिवसात लवकरच या पुरस्काराचा वितरण सोहळा सपन्न होणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी.एन. ई.136 जिल्हा शाखा बीडच्या वतीने सखाराम काशिद यांचा जिल्हा ग्रामसेवक पतपेढी ग्रामसेवक कॉलनी बीड येथे सत्कार आयोजित करण्यात आला. यावेळी बीड जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके , जिल्हा सरचिटणीस अविनाश राठोड, ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव ननवरे, सचिव तथा विस्तार अधिकारी ( पं.) बाळासाहेब जायभाये, भगवानराव तिडके, दिलीप मिसाळ, बाबासाहेब कुडके,रमेश कदम,अशोक मिसाळ, महादेव जाधव, भाऊसाहेब मिसाळ, उमेश हुलचुते, अमर सानप यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामसेवक बांधव उपस्थित होते.आदर्श ग्रामसेवक सखाराम काशिद यांची भारत भूषण पुरस्कारासाठी निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव व कौतुकाची थाप पडत आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…