मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील राजमाता महाविद्यालयाच्या राजकुंवरबाई कनिष्ठ कला शाखेतील शिकणाऱ्या विद्यार्थिनीला एका भरधाव मोटारसायकलने मागून धडक दिल्याने सानिया संजय डोंगरे वय 19 वर्ष, रा. जीवनगट्टा या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, 19 वर्षीय मृतक सानिया संजय डोंगरे ही राजमाता महाविद्यालयाच्या
राजकुंवरबाई कनिष्ठ कला शाखेतील अकरावीत शिकत होती. सदर कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग सकाळी 11.30 वाजता सुटले. त्यामुळे सानिया ही एटापल्लीपासून दोन किलमीटर अंतरावरील जीवनगट्टा या आपल्या गावी पायी जात होती. याच दरम्यान मार्गावरून तोडसा जवळील बांडे गावाचा पोलीस पाटील पेका गुंडूरु हा दुचाकीने सहा वर्षांच्या मुलास घेऊन एटापल्ली वरून जिवनगट्टा तेथे जात असताना शाळेतून घरी जात असलेल्या सानिया संजय डोंगरे हिला मोटर सायकलने जोरदार धडक दीली. या अपघातात ति गंभीर जखमी झाली व गतप्राण झाली. दुचाकी स्वार पोलीस पाटील हा हेल्मेट घालून होता परंतू त्याचा सहा वर्षाचा मुलगा या अपघातात गंभीर जखमी झाला असल्याने त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही अपघाताची माहिती प्राप्त होताच परिसरातील नागरिकांनी घटनस्थळी धाव घेतली. सानिया संजय डोंगरे हीचा मृत्यू झालेल्या संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…