वैशाली गायकवाड, उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने भर कार्यक्रमात पेट घेतल्याची मोठी बातमी समोर येत आहे. एका कार्यक्रमात दिप प्रज्वलन करताना ही घटना घडली आहे. काही वेळेसाठी खळबळ उडाली होती. आग लागल्यानंतर तात्काळ विजवली असून यामध्ये सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, खासदार सुप्रिया सुळे पुण्यातील हिंजवडीत कराटे प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमात दिपप्रज्ज्वलन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला. साडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखत आग विझवण्यात आली. सकाळी साडे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
दरम्यान, या घटनेत सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झाली नसून त्यांचे दैनंदिन कार्यक्रम ठरल्या नुसार सुरू राहणार आहेत. हा कार्यक्रम संपवून त्या बावधनमधील कार्यक्रमालाही गेल्या आहेत.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…