माझं लग्न तर झालं आहे, मात्र तो नकार देत आहे. माझ्या आईला समजल्यावर तिचं काय..’, अन भररस्त्यात ढसाढसा रडू लागली राखी सावंत.

✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:-  बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत सध्या आपल्याखाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या लग्नाच्या खुलाश्यानंतर सोशल मीडियावर एकच गोंधळ माजला आहे. एकीकडे राखी सावंतने फोटो शेअर करत आपल्या लग्नाची कबुली दिली आहे. तर दुसरीकडे राखी आपला नवरा म्हणत असलेला आदिल दुर्रानी मात्र या विषयावर मौन बाळगून आहे. तो आपल्या लग्नाबाबत काहीही बोलायला तयार नाहीय. दरम्यान राखी आदिल आपल्या फसवत असल्याची आणि आपलं लग्न होऊन त्या गोष्टीतला नाकारत असल्याचे आरोप करत आहे. अशातच आता राखी सावंतचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्री मुंबईच्या भर रस्त्यात ढसाढसा रडताना दिसून येत आहे.

प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर राखीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये राखी पापाराझींसोबत बोलतांना आणि भररस्त्यात रडतांना दिसून येत आहे. अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर आपलं दुःख व्यक्त करत आहे. राखी म्हणत आहे,’ माझं लग्न तर झालं आहे, मात्र आदिल या गोष्टीला नकार देत आहे. आता मी काय करु कुठे जाऊ. ना मला झोप येते ना मला जेवण जातं. सगळं दुःख माझ्याच नशिबात का? अभिनेत्री पुढे म्हणते माझ्या मामा, मावशी सर्व कुटुंबातील लोकांना आता ही गोष्ट कळाली आहे.

‘परंतु त्यांनी मला सांगितलंय माझ्या आई पर्यंत ही गोष्ट अजिबात पोहोचायला नको. सध्या त्या बेशुद्ध आहेत. परंतु त्यांना शुद्ध आल्यांनतर जर ही गोष्ट समजली, तर काय होईल. याच गोष्टीची भीती आहे. राखी सावंतची आई सध्या रुग्णालयात आहे. त्या ब्रेन ट्युमर-कॅन्सरसोबत झुंज देत आहेत. त्याचाय्वर सध्या उपचार सुरु आहेत. याआधीसुद्धा राखीच्या आईनीं कॅन्सरचा लढा दिला आहे. त्यांना आता पुन्हा एकदा हा आजार उदभवला आहे.

चार-पाच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर राखी सावंत आणि आदिल दुर्रानीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये या दोघांनी कोर्ट मॅरेज केल्याचं दिसून येत होतं. या फोटोनंतर राखी सावंतने स्वतः पोस्ट शेअर करत आपलं लग्न झाल्याची कबुली दिली होती. परंतु लगेचच नंतर आदिल आपल्याला फसवत असल्याचा आणि आपलं लग्न मान्य करत नसल्याने आपल्याला हा खुलासा करावा लागल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर एक खळबळ माजली आहे.

तर दुसरीकडे आदिल दुर्रानीने एका वेबसाईटला मुलाखत देत, आपल्यला दहा-बारा दिवसांचा वेळ हवा असल्याचं म्हटलं आहे. या दहा दिवसानंतर आप स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्या फोटोंचा आणि या सर्व गोष्टींचा खुलासा करणार असल्याचं म्हटलं आहे. परंतु आता मी या गोष्टीवर काहीही बोलणार नाहीय.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

4 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

4 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

4 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

4 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

4 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

4 hours ago