नितिन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- नववर्षाचे नुकतेच सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले. नव्या वर्षानिमित्त प्रत्येक घराच्या भिंतीवर नव्या कोऱ्या दिनदर्शिका दिमाखात विराजमान होऊ लागल्या आहेत. मनसेचे जनहित व विधी विभागाचे अध्यक्ष व मनसे सरचिटणीस अँड. किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या निवास्थानी अनावरण करण्यात आले.
यावेळी मनसेचे जनहित व विधी विभागाचे अध्यक्ष अँड. किशोर शिंदे, ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, जनहित व विधी विभागाचे सरचिटणीस राकेश पेडणेकर, सचिव मोहनसिंह चौहान, विभाग अध्यक्ष मनीष सावंत आदी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे शहरातील घराघरात, प्रशासकीय कार्यालय व खासगी आस्थापनांमध्ये मनसेच्या जनहित व विधी विभागाच्या दिनदर्शिका पोहचल्या असून या उपक्रमाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे व सरचिटणीस अँड. किशोर शिंदे यांनी कौतुक केले.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…