खडक पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी जिवघेणा हल्ला करणाऱ्या कोयता गँग मधिल आरोपींच्या चोवीस तासांत आवळल्या मुसक्या

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

खडक पोलीस स्टेशन पुणे शहर

पुणे :- ऐन संक्रातीच्या दिवशी भवानी पेठ येथील राहणाऱ्या एका तरुणावर जिवघेणा हल्ला करणाया कोयता सँग मधिल आरोपीना खडक पोलीस स्टेशनच्या तपास पथकाकडुन २४ तासाचे आत अटक करण्यात आले आहे.

सदरवाचत अधिक माहीती अशी की, फिर्यादी नामे प्रेम अनिल पाटोळे वय २६ वर्षे, व्यवसाय रिक्षा चालक, रा.४११, भिमाले संकुल पिंपळमळा, कासेवाडी पुणे यास त्याची पार्क केलेली मोटार सायकल पाडल्यावरुन तिन महीन्यापुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी नामे १) अनिकेत व्यकदेश कोळी २) शैलेश उर्फ साहील रामप्पा बॅगरी ३) अजय रामप्पा बॅगरी वय ४) भरत व्यंकटेश कोळी यांनी कोयत्याने हल्ला करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. म्हणुन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खडक पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक २३/२०२३ कलम ३०७, ३२४, ५०४, ५०६, ३४ भादवि सह मपोका कायदा कलम ३७ (१) १३५ सह आर्म अॅक्ट कलम ४,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

दाखल असलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने श्रीमती संगीता यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन पुणे यांनी त्याबाबत तात्काळ दखल घेवुन श्री. राजेश तटकरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), खडक पोलीस स्टेशन पुणे यांचेमार्फत तात्काळ दोन तपास पथके तयार केली व त्यांना तपासाबाबत सुचना दिल्या. नेमण्यात आलेल्या तपास पथकाने गुप्त बातमीदारांमार्फत वेगाने तपासः केल्याने गंभीर गुन्हयातील आरोपींना २४ तासांचे आत अटक करण्यात यश आले आहे.

नमुद कारवाई श्री. रितेश कुमार पोलीस आयुक्त, श्री. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ पुणे व श्री. सतिश गोवेकर, सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे श्रीमती संगीता यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. राजेश तटकरे पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. राकेश जाधव सहा. पोलीस निरीक्षक, श्री. अतुल बनकर, पोलीस उप निरीक्षक, श्री. आकाश विटे, पोलीस उप निरिक्षक, व पोलीस अंमलदार अजीज बेग, संदीप तळेकर, विशाल जाधव, सागर घाडगे, लखन बाबरे, मंगेश गायकवाड, रफिक नदाफ, अक्षयकुमार बाबळे ,नितीन जाधव, महेश पवार, महेश जाधव, योगेश चंदेल यांचे पथकाने केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

5 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

16 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

16 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

16 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

17 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

17 hours ago