नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य अशुद्ध जलवाहिन्याची तसेच मे. स्टेम प्राधिकरणाच्या योजनेमधील अत्यावश्यक कामे करण्याकरिता बुधवार दिनांक १८ जानेवारी २०२३ रोजी २४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.
स्वतःचं धरण नसणारे,स्वतःची पाणीपुरवठा योजना नसणारे, जानेवारी पासून अघोषित पाणी कपात करणारे, इतर मनपा पेक्षा जास्त दरात पाणी बिल देणारे, देशातील प्रथम दहा शहरातील स्मार्ट सिटी म्हणून ठाणे ची ओळख आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेमधील व भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्र. एनएच-३ च्या लगत गळती काढणे, शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर लोढाधाम जवळ गळती काढणे, साकेत पुलावरील मुख्य जलवाहिनीवर व्हॅक्युम एअरव्हॉल्व्ह बसविणे, इंदिरानगर संपकडे नव्याने टाकण्यात आलेल्या ११८८ मि.मि. जलवाहिन्यांची मुख्य जलवाहिनीस जोडणी करणे, पाणीपुरवठ्यामधील दैनंदिन देखभाल व दुरूस्तीची अत्यावश्यक कामे करणे तसेच मे. स्टेम प्राधिकरणाकडून त्यांच्या योजनेमधील दैनंदिन निगा व देखभाल व दुरूस्तीची अत्यंत आवश्यक कामे करण्याकरिता सदरचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने बुधवार १८/१/२०२३ रोजी सकाळी ९.०० ते गुरूवारी सकाळी ९.०० वाजेपर्यत घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी,सिद्धांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर,सिद्धेश्वर, ईटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याचा काही भाग आदी भागात २४ तासांसाठी पुर्णपणे पाणीपुरवठा बंद राहील. वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…