जिल्हाधिकारी दालनात अनुभवले भावस्पर्शी क्षण, ठाणे जिल्ह्यातील १६ अनाथ चिमुकल्यांना मिळाले आई-वडील.

नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- जिल्हाधिकारी अशोकराव शिनगारे यांच्या दालनात आज एक आगळावेगळा अनौपचारिक असा सोहळा पार पडला… जिल्ह्यातील 16 बालकांना आज आज एकाच वेळी कायदेशीर रित्या पालक मिळाले. दत्तक आदेश घेताना पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता.. तर ही प्रक्रिया पार पडताना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हेही भावुक झाले होते.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 नुसार अनाथ, सोडून दिलेले व परित्यागीत बालकांचे दत्तक आदेश तसेच नात्यांतर्गत दत्तक व सावत्र दत्तक करण्याकरीता दत्तक नियमावली 2022 तयार करण्यात आली आहे. त्यानुसार सदर आदेश पारीत करण्याची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. यापूर्वी सदर दत्तक आदेश न्यायालयामार्फत केले जात होते. आता मात्र ही जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार या प्रकरणाची सुनावणी करून इच्छुक पालकांकडे दत्तक बालके देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी आज पालकांना सुपूर्द केले. यावेळी दत्तक घेतलेल्या पालकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. नेरुळ येथील चिल्ड्रन ऑफ द वर्ड इंडिया ट्रस्ट व डोंबिवली येथील जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट दत्तक संस्थांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली.

यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी, संरक्षण अधिकारी पल्लवी जाधव, सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी शिरसाट, नेरुळ येथील चिल्ड्रन ऑफ द वर्ड इंडिया ट्रस्ट दत्तक संस्थेच्या बेट्टी मथाई, डोंबिवलीतील जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट वंदना पाटील आदी उपस्थित होते.

बालकल्याण समिती ठाणे यांच्या आदेशान्वये या दोन्ही संस्थांमध्ये अनाथ, सोडून दिलेले व परित्यागीत बालकांना दाखल करण्यात येते. CARA (Central Adoption Resource Authority) CARINGs cara.nic.in या संकेतस्थळावर दत्तक इच्छुक पालक नोंदणी करून ‘कारा’ ने दाखविलेले मुलगा किंवा मुलीला पालकांनी राखीव केल्यानंतर दत्तक समितीद्वारे पालकांची मुलाखत घेऊन दत्तक आदेश करीता जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करण्यात येते.

जीवनातील एक वेगळा क्षण: अनाथ, सोडून दिलेले व परित्यागित बालकांना पालक मिळणे व याचा आनंद हा त्या बालकांच्या चेहऱ्यावर पाहणे क्षण आगळावेगळा आहे. हे मानवतेचे काम माझ्या सहीने होत आहे, हा माझ्या जीवनातील अनोखा क्षण असल्याची भावना जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी यावेळी व्यक्त केली. दत्तक घेणाऱ्या पालकांनी श्री. शिनगारे यांनी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी दत्तक जाणारी बालकेही उपस्थित होती. त्यांच्या हसण्या-खेळण्याने जिल्हाधिकारी यांच्या दालनाला आज वेगळेच रुप आले होते.

तीन बालके जाणार परदेशात: जिल्ह्यातील 6 महिना ते 6 वर्षाची मुले वर्षामधील 16 बालकांचे दत्तक आदेश आज जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी आज पारित केले. विशेष म्हणजे मुली दत्तक घेणाऱ्यांचे प्रमाण यामध्ये जात आहे. दत्तक गेलेल्यांपैकी 11 मुली व पाच मुलांचा समावेश आहे. आज आदेश दिलेल्यांमधील दोन मुली या अमेरिकेतील पालकांकडे तर एक मुलगा हा इटलीतील पालकांकडे जाणार आहे. तर महाराष्ट्रात 7, ओरिसामध्ये, त्रिपुरा, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक, गुजरात या राज्यात प्रत्येकी एका पालकांकडे ही बालके दत्तक गेली आहेत.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

13 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago