नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- शहरात बेकायदेशीरपणे होर्डिंग्ज लावून शहर विद्रुप करणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने होर्डिंग्ज हटविण्याची कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहे. त्यानुसार ठाणे महापालिका भवन समोरील कचराळी तलाव सर्कल येथे बेकायदेशीर पणे लावण्यात आलेल्या होर्डिंग्जवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. सदर होर्डिंग्जवर सामाजिक तेढ निर्माण करणारा मजकूर लिहल्याचे निदर्शनास येताच असे होर्डिंग्ज तात्काळ हटविण्यात आले. याबाबत महेश आहेर (सहाय्यक आयुक्त सनियंत्रण व समन्वय) यांनी स्वत: अज्ञातांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे.
जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग कचराळी तलाव येथील महापालिका भवन जवळील सर्कल येथील सिद्धीविनायक मंदिर प्रवेशद्वार येथे 6 बाय 8 फूट मोजमापाचा बेकायदेशीररित्या होर्डिंग लावून त्यावर ‘खाऊन खाऊन 50 खोके, माजलेत बोके, माजलेत बोके’ असा आक्षेपार्ह मजकूर लिहलेला व त्याच्या शेजारीच 8 बाय 8 फूट मोजमापाच्या होर्डिंगवर’ भूखंडाचे श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का?’ असा मजकूर लिहून सामाजिक गटामध्ये जाणीवपूर्वक तणाव व तेढ निर्माण करणारा प्रकार अज्ञात व्यक्तींनी केला असल्याचे निदर्शनास आले. सदरचे होर्डिग्ज हे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने ताब्यात घेतले असून अज्ञात इसमां विरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सदरची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली (सहाय्यक आयुक्त सनियंत्रण व समन्वय) महेश आहेर यांनी अतिक्रमण विभागाच्या कर्मचा-यांसमवेत केली. यापुढेही महापालिकेच्यावतीने अनधिकृत होर्डिंग्जवरील कारवाई सुरूच राहणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी नमूद केले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…