ठाणे खंडणी विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी,
नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- भिवंडी येथे राहणाऱ्या रुपाली सतिश बोचरे वय 32 वर्ष ह्या खाजगी कंपनीत नोकरीला असणाऱ्या महिलेची एटीएम सेंटर मध्ये फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना ठाणे खंडणी विभागाने मोठ्या शिताफिने पकडल्याचे व त्यांच्या कडून 101 एटीएम कार्ड,70,000/- रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेल वाहन असा एकूण 4,06,200/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
2/1/2023 रोजी रुपाली सतिश बोचरे या वागळे इस्टेट रोड नं 22 येथील एसबीआयच्या एटीएम मध्ये 50,000/- रुपये भरण्यासाठी गेल्या असता त्यांना तेथे हजर असलेल्या 32 ते 38 वयोगटाच्या अनोळखी इसमाने मदत करण्याच्या बहाण्याने मार्गदर्शन करत असल्याचे भासवून त्यांचे पैसे भरून झाल्या नंतर हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्डाची अदलाबद्दल करून तिला दुसरेच कार्ड दिले, त्यानंतर रुपाली बोचरे पैसे भरून निघून गेल्यावर त्या इसमाने त्या पैसे भरणा करते वेळी पाहिलेला पिन नंबर वापरून तिच्या बँक खात्यातून 38,500/- रुपये काढून त्यांची फसवणूक केली होती.
या गुन्ह्याचा तपास खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस शिपाई तानाजी पाटील, अरविंद शेजवळ यांनी सुरु करून एटीएम सेंटर मधील सिसिटीव्ही फुटेज तपासून त्यातील संशयिताची वैयक्तिक माहिती व मोबाईल फोन मिळवून, गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळवली होती,तेव्हा त्यांना आरोपी पंढरपूर सोलापूर येथे पळून गेल्याचे समजले त्या प्रमाणे त्यांनी सोलापूर येथे जाऊन तिन आरोपीना ताब्यात घेतले, व त्यांच्यातील चौथ्या आरोपीला उल्हासनगर येथून ताब्यात घेतले त्यांची नावे सनी मुन्ना सिंग उर्फ सनी चिकना वय 28 राहणार कोळसेवाडी ठाणे, श्रीकांत प्रकाश गोडबोले उर्फ श्री वय 28 राहणार उल्हासनगर 2, हरिदास मोहन मगरे वय 25 राहणार उल्हासनगर 2, रामराव उर्फ कचरू शेंडफड शिरसाठ वय 35 यांना अटक करण्यात आली, त्याच्या तपासात बँकेच्या एटीएम सेंटर मध्ये पैसे भरण्याकरिता तसेच काढण्याकरिता येणाऱ्या महिला वयोवृद्ध नागरिकांना हेरून त्यांची फसवणूक केल्याचे 8 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…