विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन श्रीरामपूर:- येथे समस्त ख्रिस्ती समाजाच्या वतीने श्रीरामपूर येथे भव्य मूक महा 17 जानेवारीला 10 वाजता काढण्यात आला. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्मारक येथून सुरू होऊन प्रांत कार्यालय श्रीरामपूर येथील अधिकाऱ्याला निवेदन देऊन नंतर सभा होऊन संपला. यावेळी आज सर्वीकडे ख्रिस्ती समाजावर अत्याचार, हल्ले, अन्याय होत आहे. मानव अधिकार पायाखाली तुडवला जात आहे. त्यामुळे आज ख्रिस्ती समाज भायाखली आपल जीवन जगत आहे. त्यामुळे हा मूक मोर्चा काढण्यात आला.
धर्मांतराच्या नावाखाली ख्रिस्ती धर्मगुरू व चर्चवर होणारे हल्ले तसेच समाजाची होणारी बदनामी थांबवावी, यासाठी आज श्रीरामपूर येथे राष्ट्रीय ख्रिस्ती आघाडी व युवा संघटना व ख्रिस्ती धर्मगुरु समाजबांधव यांनी प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा काढला. या मोर्चाला ख्रिस्ती समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद पाहावयास मिळाला.
गेल्या काही दिवसांपासून धर्मांतराच्या नावाखाली अनेक चर्चवर हल्ले होत आहेत. अनेक ख्रिस्ती धर्मगुरुवर जीवघेणे हल्ले होत आहेत. ख्रिस्ती समाजाचे सण उत्सव इत्यादी कार्यक्रमांमध्येही हल्ले होत आहेत. या सर्व घटनांचा ख्रिस्ती समाजाच्या वतीने आज निषेध नोंदवला गेला व देशात सर्वधर्म समभाव तसेच शांतता राहावी, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…