नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अंधेरी:- अंधेरीत एका समाजसेवकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडे खंडणीची मागणी केल्या प्रकरणी एका महिलेसह तिच्या मित्राला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी ११ जानेवारीला अटक केली आहे. प्रियांका वैद्य आणि राजू पुजारी अशी या दोघांची नावे असून खंडणीच्या याच गुन्ह्यांत या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रियांकाने अशाच प्रकारे पाचहून अधिक व्यक्तींना तिच्याकडे आकर्षिक करून त्यांच्याकडून खंडणीवसुली केल्याचे बोलले जात असून या सर्व प्रकरणाचा आता पोलिसांकडून तपास सुरू आहे.३१ वर्षांचे तक्रारदार बोरिवली परिसरात राहत असून एका खासगी कंपनीत कामाला आहेत. गेल्या वर्षी त्यांची प्रियांकाशी ओळख झाली होती. तिने ती समाजसेविका असून तिचा राजू पुजारी हा मित्र असल्याचे सांगितले होते.
मोबाईल क्रमांक शेअर केल्यानंतर ती त्यांना सतत कॉल करून भेटायला बोलावत होती. ती सतत त्यांच्याशी जवळिक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. ते भेटत नसल्याने ती त्यांच्यावर दबाव आणत होती. लग्नाचे प्रलोभन दाखवून त्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. लग्न न करता तिची फसवणूक केली, असा आरोप करुन पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देत होती. ही धमकी देऊन प्रियांकासह राजूने त्यांच्याकडून आठ लाखांची खंडणी वसूल केली होती. सतत खंडणीची मागणी करणाऱ्या प्रियांकासह राजू पुजारीविरुद्ध अखेर तक्रारदारांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी खंडणीसह जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या वेळी कोर्टाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासात प्रियांकाने राजूच्या मदतीने अशाच प्रकारे पाच जणांना स्वतःकडे आकर्षित करून त्यांच्याशी जवळिक निर्माण करून खंडणीवसुली केली होती. या पाच जणांची नावे पोलिसांना समजली असून त्यांची लवकरच पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…