सुरजागड लोह वाहतूक वाहनांमुळे नागरिक त्रस्त, रस्त्यावर खड्डे व धुळीचे साम्राज्य.

राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी

मुलचेरा :- काल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 356 वर चौडमपल्ली गावाजवळ सुरजागड लोह वाहतूक करणारी वाहन रस्त्यावर खड्यात फसल्याने विरुध्द दिशेने येणारी राज्य परिवहन महामंडळ ची बस रस्त्याच्या खाली उतरवल्या मुळे बस सुध्दा चिखलात फसली, त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पुर्णपणे कोलमडली. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहतूकदारांना मोठ्या मनस्ताप सहन करावा लागला.

बस आणि लोह वाहतूक करणारा ट्रक चिखलात फसल्यानुळे संपुर्ण महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती. अशात 3 तास प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. सुरजागड लोह वाहतूक करणारी वाहनांमुळे आष्टी ते आलापल्ली पर्यंत राष्ट्रीय महामार्गाची इतकी दुरावस्था झाली आहे की, रस्त्यावर खड्डे का खड्यात रस्ता आहे हेच कळत नाही. अशा रस्त्यावर प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

तसेच या मार्गावर धुळीचे साम्राज्य इतकं जास्त पसरले आहे, समोरुन येणारे वाहने पण धुळीमुळे दिसत नाही. पुर्ण धुळ प्रवाशांच्या नाकात, डोळ्यात, तोंडांत जात असल्याने आरोग्यावर सुध्दा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच अपघाताचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढले आहे. या भागातील लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी वेळेवर लक्ष देऊन राष्ट्रीय महामार्गाची दुरूस्ती लवकरात लवकर करावी , अन्यथा आलापल्ली ते आष्टी क्षेत्रातील नागरिक रस्त्यावर येऊन आंदोलन करू, असे बोलले जात आहे..

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

3 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

6 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

1 day ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago