युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे, पोलिसांनी एका महिलेला व अल्पवयीन मुलाला गांजाच्या तस्करी करण्याबाबत नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.
ट्रॅव्हल्समधून नागपूरमार्गे बंगरुळू येथे गांजाची तस्करी करणाऱ्या महिलेला धंतोली पोलिसांनी अटक केली. महिलेकडून 13 किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी 15 जानेवारी दुपारी साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास केली.
जबिना खान वय 32, रा. माहूर, नांदेड असे महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जबिना अजनी चौकात ऑरेंज ट्रॅव्हल्समध्ये बसत असताना, तेथील वाहतूक पोलिसांना गांजाचा वास आला. त्यांनी बस थांबवून धंतोली पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक फरताडे यांच्या नेतृत्वातील पथकाने अजनी चौकात जाऊन महिलेच्या बॅगची झडती घेतली असता, तिच्याकडे 13 किलो गांजा आढळला. ताब्यात घेऊन विचारणा केली असता, हा गांजा बंगरुळू येथे घेऊन जात असल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये जबिनाला अटक केली असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले.
जबिनाला गांजा बंगरुळू येथे नेण्यास सांगण्यात आले. त्यानुसार ती माहूर येथून नागपुरात आली. गणेशपेठ स्थानक परिसरातून बसल्यास शंका येण्याची शक्यता असल्याने तिने अजनी येथून बसण्याचा निर्णय घेतला. मात्र, तेथील वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती पोलिसांच्या जाळ्यात सापडली. बंगरुळूमध्ये गांजा नेमका कोणाला द्यायचा, हे तिला तिथे गेल्यावर सांगण्यात येणार होते, अशी माहिती तिने दिले. त्यामुळे केवळ ‘कॅरिअर’ म्हणून तिचा वापर करण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…