हिंगणघाट: मच्छिमारांचे कैवारी भोई भटक्यांचे आरक्षणाचे प्रणेते, मत्स्य सहकार महर्षी स्व. जतीरामजी बर्वे यांची ३९ वी पुण्यतिथी..

प्रवीण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मच्छिमारांचे कैवारी भोई भटक्यांचे आरक्षणाचे प्रणेते, मत्स्य सहकार महर्षी स्व. जतीरामजी बर्वे माजी खासदार यांची ३९ वी पुण्यतिथी कार्यक्रम भोई पुरा हिंगणघाट येथे भोई समाज बांधवांचे उपस्थित श्रद्धांजली वाहुन तसेच महाप्रसादाचे वाटप करून साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमला उपस्थित बाला भोई संस्थेचे अध्यक्ष अशोक मोरे, शेखर दाते, अनिल ढाले, दिलीप सातघरे, विक्कि कापटे, शुभाष कोल्हे, रूपेश राजुरकर, प्रशांत लांडगे, आशिष सुरजुसे, मधुकरराव रघाताटे, बबलू मोरे, खुशाल बावणे, लक्ष्मण कापटे व ईतर महीला व पुरुष उपस्थित होते.

कै. जतिरामजी बर्वे साहेबांचा जन्म हा पोटासाठी भटकंती करणा-या जमातीत अर्थात मच्छिमारीचे कार्य करणा-या भोई, कहार, ढिवर, केवट… या व त्यांच्या तत्सम जमाती समाज घटकात 21 एप्रिल 1919 रोजी रामटेक गांवी झाला. बर्वेजींचे कुटुंब अनेक काबाड कष्ट करुन आपले जीवन जगत होते अशावेळी स्वातंत्र्याचे वारे सर्वदूर पसरले होते. इंग्रज सत्ते विरुद्ध चले जावचा लढा उभा राहिला होता.

आपण ही भारत मातेचे सुपुत्र आहोत आणि आपण ही भारत मातेसाठी काही तरी करावे असे त्यांना सतत वाटत होते म्हणून त्यांनी 1942 च्या चलेजाव आंदोलनात सहभाग घेतला. इंग्रज सरकार विरुद्ध बंड ही केले आणि त्यातून त्यांना 22 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. 4 वर्ष शिक्षा भोगत असतांना स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीत सहभागी झालेल्या सहकार्यांकडून त्यांची दखल घेतली गेली आणि 1942 मध्ये त्यांना त्यातून मुक्त केले गेले. समाज सेवा करतांना त्यांनी राजकारणात ही सहभाग घेतला होता.

मत्स्य क्षेत्रात ही त्यांनी खुप मोलाची कामगिरी केली आहे. भटक्या विमुक्तांच्या विकास कार्यासाठी 1973 ला नागपूर राज्यातील समस्त मच्छिमार समाज घटकासाठी फार मोठा मेळावा झाला. राज्यस्तरावर भोई, कहार, ढिवर आणि त्यांच्या संपुर्ण उपजाती यांच्या समाजआरक्षण हक्कासाठी जे प्रयत्न झाले त्यात त्याचे मोठे योगदान आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

वाढदिवसाच्या दिवशी आईने नवीन मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून 15 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…

47 mins ago

सांगलीतील उद्योजक कुटुंबाचा बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…

1 hour ago

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

6 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

8 hours ago