सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- शहरातून एक खळबजनक बातमी समोर येत आहे. शहरातील बाबूपेठ जुनोना चौकात राहणाऱ्या एका अवैध सावकाराकडून गरीब नागरिकांची आर्थिक लूट करीत असल्याच्या गुप्त माहितीवरून सहकार व पोलिस विभागाने धाड टाकून त्यांच्या कडून अनेक खळबळजनक दस्तावेश त्यामध्ये 10 बँकचे पासबुक, 98 कोरे स्टॅम्प पेपरसह अनेक कागदपत्रे जप्त केली.
या धडक कारवाईमुळे जिल्हातील अनेक अवैध सावकारचे धाबे चांगलेच दणाणले आहे. दरम्यान, जप्त केलेल्या आक्षेपार्ह कागदपत्रांतून अनेक नागरिकांना लुटून अलोट संपत्तीचे घबाड बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गजराजसिंग खल्लीसिंग ठाकूर, रा. जुनोका चौक, बाबूपेठ चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.
गरीब, शेतकरी आणि गरजू नागरिकांची अवैध सावकारी पाशातून मुक्तता करण्यासाठी राज्य शासनाच्या सावकारी अधिनियम अन्वये अवैध सावकारी करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. अधिकृत सावकारी करायचीच असेल तर त्यासाठी या अधिनियमाच्या चौकटीतून परवाना काढावा लागतो. कोरोनाकाळात पराकोटीची आर्थिक विषमता निर्माण झाल्याने अवैध सावकारी जोरात सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, जिल्हा निबंधक कार्यालयाने गांभीऱ्याने लक्ष घातल्याने अवैध सावकारीने डोके वर काढले नव्हते. काही दिवसांपूर्वी जुनोना चौकातील गजराजसिंग खल्लीसिंग ठाकूर नावाचा एक व्यक्ती अवैध सावकारी करीत असल्याची माहिती सहकार विभागाला मिळाली. शिवाय, अवैध सावकारीसंदर्भात तक्रारीही प्राप्त झाल्या. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांच्या आदेशान्वये, सहकार विभाग व पोलिसांनी चंद्रपूरचे प्राधिकृत अधिकारी तथा सहायक निबंधक एस. एस. तुपट, बल्लारपूरचे एम.डी. मेश्राम, सहकार खात्यातील कर्मचारी यांच्या पथकाने आरोपी गजराजसिंग खल्लीसिंग ठाकूर याच्या घरावर गुरुवारी 12 जानेवारी रोजी धाड टाकली.
या धाडीत अवैध सावकारीशी संबंधित अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांच्या मार्गदर्शनातील कारवाई पथकात सहायक निबंधक एस. एस. तुपट यांच्यासह सहायक निबंधक सहकारी संस्था बल्लारपूरचे एम.डी. मेश्राम, सहकार अधिकारी एस. के. बगडे, प्रशांत गाडे, जाधव, भोयर, सरपाते, गौरखेडे, सिडाम, दरणे आदींचा समावेश होता.
अजून काय मिळाले सावकाराच्या घरात ?
पथकाने आक्षेपार्ह कागदपत्रांचा शोध घेतला असता काही लिहिलेले व कोरे असे 98 स्टॅम्प पेपर, 112 कोरे धनादेश, रेव्हेन्यू तिकीट लावलेल्या सहा पावत्या, रकमेच्या नोंदी असलेले चार रजिस्टर, 10 बँक पासबुक, तसेच अनेक व्यक्तीच्या नावे असलेले मतदान कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, इतर विक्रीपत्र व मालमत्ता पत्र आदी कागदपत्रे आढळली. ही सर्व कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली. कागदपत्रांच्या चौकशीनंतर संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती निबंधक एस. एस. तुपट यांनी दिली.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…